Ticker

6/recent/ticker-posts

सेवानिवृत्त वनाधिकारी नारायण कटकमवार कार दुर्घटनेत निधन ; मंगळवार ( दि.३१) रोजी सकाळी ११ च्या सुमारास होणार अंत्यसंस्कारकिनवट : येथील सेवानिवृत्त वनाधिकारीतथा गोदावरी अर्बन बँकेचे सल्लागार नारायण संट्टना कटकमवार (वय ६४ वर्षे) यांचे सोमवार (दि.३०) रोजी दुपारी साडेबारा वाजता अंबाडी घाटात कार दुर्घटनेत निधन झाले


सेवानिवृत्त वनाधिकारी नारायण  कटकमवार  कार दुर्घटनेत निधन ; मंगळवार ( दि.३१) रोजी सकाळी ११ च्या सुमारास होणार अंत्यसंस्कार


किनवट : येथील सेवानिवृत्त वनाधिकारी
तथा गोदावरी अर्बन बँकेचे सल्लागार नारायण 

संट्टना कटकमवार (वय ६४ वर्षे) यांचे
 सोमवार (दि.३०) रोजी 

दुपारी साडेबारा वाजता अंबाडी घाटात 
कार दुर्घटनेत निधन झाले. 

त्यांचे पार्थिवावर येथील स्मशानभूमीत 
मंगळवार ( दि.३१) रोजी सकाळी ११च्या 

सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
        
  नारायण संट्टना कटकमवार  हे सोमवार (दि.३०) रोजी सकाळी साडेअकराच्या 

सुमारास  पायाच्या  उपचारासाठी 
तेलंगणातील आदिलाबादकडे जात होते.

 यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन मुले 
आर्किटेक्ट योगेश व महेश होते. 

अंबाडी घाटात अचानक गाडीचा अपघात झाला. 

त्यात गाडीच्या समोरील भाग चक्काचूर झाला. त्यात त्यांच्या डोक्याला व छातीला जबर मार लागला ही माहिती

 त्यांच्या नातेवाईकांना पोहोचेपर्यंत याच मार्गावरून मांडवी येथून  गाडीने किनवटकडे येणाऱ्या शिक्षकांनी  

जखमींना गाडीत टाकून सानेगुरुजी 
रुग्णालयात दाखल केले.  

या जबर अपघातात त्यांच्या छातीच्या सापळ्या तुटून फुफसांना गंभीर दुखापत झाल्याने ते उपचाराला साथ देईनात. 

शेवटी त्यांचे निधन झाल्याचे डॉ. अशोक बेलखोडे यांनी घोषीत केले. 

झाला या घटनेमुळे किनवट शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. 

या दुर्घटनेत त्यांच्या एका मुलास जबर मार लागल्यामुळे त्यास पुढील उपचारासाठी आदिलाबाद येथे हलविण्यात आले आहे

 तर दुसऱ्यास किरकोळ मार असल्याने किनवट येथेच उपचार्थ ठेवले आहे. 

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, 

जावई,नातवंडं असा मोठा परिवार असून खासदार हेमंत पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय 
तथा गोदावरी अर्बन बँकेचे संचालक प्रा. सुरेश कटकमवार यांचे व कृषि विभागातील शंभू कटकमवार यांचे ते बंधू होत.
   

    ते अत्यंत प्रेमळ, सुस्वभावाचे होते, वृक्षसंवर्धन, पशुपक्षी संरक्षणासाठी त्यांनी छाटणीच्या नावाखाली 

जंगलतोड करू नये याकरिता मुख्यमंत्री महोदयांना अनेकवेळा पत्रव्यवहार केला होता. 

सेवानिवृतीपुर्वी काहीकाळ ज्या वनात त्यांनी कर्तव्य बजावलं त्याच वनात त्यांची विचित्र अपघातात प्राणज्योत मावळली.