Ticker

6/recent/ticker-posts

सिंदखेड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी दोघावर गुन्हा दाखल.


नांदेड/माहूर,दि : २१ :- विज बिल वसुली करण्यासाठी गेलेल्या कनिष्ठ अभियंता व त्यांच्या पथकाला शिवीगाळ 

करून धक्काबुक्की करून जिवे 
मारण्याची धमकी देऊन 

शासकीय कामात अडथळा 
आणल्याप्रकरणी कनिष्ठ अभियंता 

यांच्या फिर्यादीवरून सिंदखेड पोलिस ठाण्यात वाई बाजार येथील बिरसा मुंडा चौकात वास्तव्यास असलेल्या

 अरुण वसंत पवार व अरविंद वसंत पवार या दोघावर गुन्हा दाखल केला आहे.


वाई बाजार महावितरण कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सुरेशसिंग मानसिंग राठोड हे आपल्या पथकासह 

२० ऑगष्ट रोजी दु.१२.१५ मि दरम्यान वाई बाजार येथील बिरसा मुंडा चौकात वीज वसुलीसाठी गेले असता 

गैरअर्जदारांच्या घरातील शौचालयाजवळ असलेल्या विद्युत मीटर मध्ये छेडछाड करुण विज चोरी केल्याचे निदर्शनास आले. 

छेडछाड केलेल्या मीटरला महावितरण कंपनीच्या नियमानुसार ताब्यात घेत असताना,

 गैर अर्जदारांनी फिर्यादीस शिवीगाळ करून दहशत निर्माण करून धक्का बुक्की करून 

शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय काम करू दिले नाही व खोटी केस करण्याची धमकी दिली. 

अशा आशयाची फिर्याद कनिष्ठ अभियंता राठोड यांच्या फिर्यादीवरून गैर अर्जदार अरुण वसंत पवार व अरविंद वसंत पवार रा. वाई बाजार 

यांच्याविरुद्ध गु र न १२३/ २०२१ कलम ३५३, ३३२,५०४,५०६,३४ भा, द, 

वि,व भारतीय विद्युत कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 
या प्रकरणाचा अधिक तपास सिंदखेड पोलीस ठाण्याचे सपोनि भालचंद्र तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करीत आहे.