Ticker

6/recent/ticker-posts

*@देगलूर आगारात पाणीच पाणी,डेंगू चा धोका वाढला@*देगलूर(प्रतिनिधी): गेल्या आठवडा भरापासून होत असलेल्या पावसामुळे देगलूर बस आगारात दोन ते तीन फूट एवढे पावसाचे पाणी साचले असून त्यामुळे डेंगू चे डास वाढून आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे


*@देगलूर आगारात पाणीच पाणी,डेंगू चा धोका वाढला@*
देगलूर(प्रतिनिधी): गेल्या  आठवडा भरापासून होत असलेल्या पावसामुळे देगलूर बस आगारात दोन ते तीन फूट एवढे पावसाचे पाणी साचले असून त्यामुळे डेंगू चे डास वाढून आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.


आगारात अनेक खड्डे निर्माण झाल्याने
 त्या जागी पाणी भरल्याने बस चालकांना बस 

चालवण्यासाठी कसरत करावी
 लागत आहे.
तसेच

 आगारात काम करणाऱ्या मेकॅनिक व इतर कर्मचाऱ्यांना जीव मुठीत काम करावे लागत आहे 

तर डेंगू होण्याची भीतीमुळे सर्वजण भयभीत झाले आहेत.
यासाठी कामगार सेनेचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी या संदर्भात आगार

 प्रमुख अशोक चव्हाण यांना निवेदन देऊन आगारात मोकळ्या जागेवर 

मुरूम टाकणे,खड्डे बुजवणे व कर्मचाऱ्यांचा आरोग्याच्या दृष्टीने योग्य पावले 

उचलणे,परिसराचे निर्जंतुकीकरण 
करणे आदी मागण्या केले आहेत.

लवकरात लवकर सर्व कामे न केल्यास आंदोलन करण्यात येईलण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे.


निवेदनावर कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष तथा युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील,
 युवा सेनेचे संदीप पाटील,

आगार सेनेचे सचिव शंकर रावनपल्ले, उपाध्यक्ष नागनाथ सुरनर,कार्याध्यक्ष जयपाल जाधव, विठ्ठल मठ्ठमवार, 

आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.