Ticker

6/recent/ticker-posts

किनवट शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या प्रश्नांसह गुत्तेदार बदल आणि कामाच्या चौकशीचा प्रश्न केंद्रीयमंत्री नितीन गडकरींशी चर्चेनंतर निकाली लागला . व्यंकट भंडारवार


किनवट/प्रतिनिधी— किनवट शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाच्या 

प्रश्नांसह गुत्तेदार बदल आणि कामाच्या चौकशीचा प्रश्न केंद्रीयमंत्री नितीन गडकरींशी 

चर्चेनंतर निकाली लागला असल्याने रस्तेविकासाला चालणा मिळाली आहे. 

व्यंकट भंडारवार यांच्या शिष्ठमंडळाने शुक्रवारी (२०आगस्ट) केंद्रीयमंत्री गडकरींची नागपूर निवासी भेट घेतल्यानंतर 

सर्वच विषयावर तोडगा निघाल्याचे आज (२१आॅगस्ट) पत्रकार परिषदेत सांगितले.


कोठारी ते हिमायतनगर (१६१/ए) या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ते विकासाच्या कामात प्रचंड अनियमितता चालू आहे. कामात दर्जा राहिलेला नाही.

 त्यामुळे राठी नावाचा कंत्राटदार बदलणे. गोकुंदा शहरापर्यंत शंभर फुटावर कामे चालू आहेत. 
किनवट शहरात मात्र साठ फुटापर्यंतच नालीसह कामे गुंडाळल्या जात होते 

आतामात्र मुळ अंदाजपत्रकानुसारच शहरातील रस्ता होणार. 

अशा महत्वाच्या मागण्या घेऊन शिवसेनेचे तालुका संघटक व्यंकट भंडारवार, 
युवासेनेचे प्रशांत कोरडे, 

राष्ट्रवादी काँग्रेसचे किनवट/माहूर विधानसभा मतदारसंघाध्यक्ष वैजनाथ करपुडे व राकाँ.कार्यकर्ता अमरदीप कदम यांनी 
मंत्री गडकरींची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केल्यानंतर असा तोडगा काढण्यात आला.

२१ आँगस्ट रोजी मंत्री गडकरींच्या नागपूर येथिल बंगल्यासमोर या शिष्ठमंडळाचे उपोषणाची तिथी होती. 

मात्र २० आॅगस्ट रोजीच मंत्री गडकरींशी शिष्ठमंडळाची चर्चा होऊन समाधान झाल्याने रस्ते विकासाला गती मिळेल असे चित्र दिसते