मुंबई : ‘‘कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
त्यानुसार राज्यात ज्या ठिकाणी कोरोना
प्रसार वाढीचा दर जास्त आहे.
अशा ठिकाणी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन रात्रीची कडक संचार बंदी लागू केली जाईल.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लवकरच घोषणा करतील,’’
असे वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे
यांनी केले आहे
देशातील ४१ जिल्ह्यांमध्ये १० टक्क्यांपेक्षा
जास्त संसर्गदर असून,
करोनाची दुसरी लाट अजूनही कायम आहे.
करोनासंदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याची माहिती
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम
भार्गव यांनी दिली होती.
केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यांनी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुलनेने
अधिक प्रतिबंधात्मक उपाय योजण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने निदर्शनास आणून दिले होते.
केरळमध्ये रुग्णसंख्येत वाढ कायम दिसून येत आहे. शनिवारी दिवसभरात सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी ३१ हजार २६५
करोनाबाधित एकट्या केरळ राज्यातील आहेत.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ३० हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत.
तेथे ओणम या उत्सवासाठी लोक
एकत्र आले होते.
तर महाराष्ट्रात लवकरच गणपती
उत्सव येणार आहे.
त्यापार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये,
यासाठी राज्य सरकार निर्बंध कडक