Ticker

6/recent/ticker-posts

राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना *महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती* ★ प्रेरणास्थान ★ *मा. अॅड. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर*प्रदेश अध्यक्ष सोमनाथ गायकवाड जिल्हा अध्यक्ष गजानन मिसाळ


राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना
    *महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती*
                 ★ प्रेरणास्थान ★
 *मा. अॅड. श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर*
प्रदेश अध्यक्ष  सोमनाथ गायकवाड
 जिल्हा अध्यक्ष गजानन मिसाळ

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती च्या वतिने लोककलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर....

काल दि 17/8/2021वार मंगळवार ला महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती खामगांव तालुक्या च्या वतीने जिल्हा महासचिव गायक महेंद्र सावंग आणी तालुका 

अध्यक्ष भारत हिवराळे यांच्या नेतृत्वात लोककलावंत यांच्या विविध मागण्यांच निवेदन  उपविभागीय अधिकारी कार्यालय 

खामगाव यांच्या मार्फत मा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा पालकमंत्री मा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना खालील विषयाचं निवेदन देण्यात आले 


1) धूळ खात असलेले वृद्धकलावंत यांचे मानधन अर्ज ताबडतोब निकाली काढावे.


2) शासनाने ठरवलेल्या 56 हजार लोककलावंताना प्रत्येकी 5 हजार रुपये आथिर्क मदत जाहीर केली ती सरसकट सर्व लोककलावंताना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात यावे. 


3) बुलढाणा जिल्ह्याची मानधन समिती लवकरात लवकर गठीत करावी व त्या समिती मद्ये महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती चा एक कलावंत सदस्य म्हणून घेण्यात यावा.


4) सर्व लोककलावंतांची शासन दरबारी लोककलावंत म्हणून  नोंद करण्यात यावी व शासनाचं ओळखपत्र देण्यात याव. 


5) लोककलावंत यांना घरकुल योजने मध्ये समाविष्ट करुन त्यांना प्रथम लाभ देण्यात यावा.


6) लोककलावंत यांच्या मुलांना  मोफत शिक्षण देण्यात यावे.

7) सर्व लोककलावंताना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी.


8 ) सर्व लोककलावंताना प्रवास करण्यासाठी प्रवासामध्ये मुळ दराच्या 50 टक्के दर आकारून सवलत देण्यात यावी. 


9) वृद्ध कलावंत मानधन योजनेमध्ये जी 50 वर्ष वय अशी अट आहे ती कमी करुन 30  वर्ष वय करावी जेणेकरून लोककलावंत 

यांना वयाच्या 30 वर्षापासून मानधन मिळेल व त्या आधारे तो आपल्या परिवाराचे पालन पोषण करू शकेल. 


वरील सर्व मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले निवेदन देतेवेळी महाराष्ट्र कलावंत न्याय 

हक्क समिती चे जिल्हा महासचिव गायक महेंद्र सावंग. तालुका अध्यक्ष भारत हिवराळे. 

वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष गणेशभाऊ चौकशे. महिला जिल्हा अध्यक्षा विषाखाताई सावंग. 

शहर अध्यक्ष धम्मपाल नितनवरे . ढोलक वादक विजय दांडगे. 

राहुल हिवराळे.  गायीका कल्पना खंडेराव. ॲक्टोपॅड वादक दर्पण शर्मा. 

ऑक्टोपॅड वादक गौतम पोहरे. शास्त्रीय गायक अजिंक्य भवर. शाहीर महादेव धुरंदर .

 शाहीर वासुदेव धुरंधर. साहेबराव सावंग. शाहीर नारायण खंडारे. प्रल्हाद इखारे. 
 नाल वादक गोपाल हिवराळे. 

अरविंद तायडे. राजेंद्र राऊत.  बँड मालक दिलीप पोळके . यांच्यासह आदी कलावंत उपस्थीत होते