Ticker

6/recent/ticker-posts

आज मितीस किनवट शहरात डेंग्यू ने थैमान घातले आहे, त्यामुळे शहरातील मुलं आजारी आहे, पांढऱ्या पेशी कमी होणे, खवखव, ताप, खोकला , सर्दी ने ग्रस्त होऊन किनवट शहरातील रुग्णालय तर फुल्ल झाले आहे काहींना आदीलाबाद , नांदेड करिता संदर्भित करण्यात आले आहे


*अत्यंत खेदजनक*

आज मितीस किनवट शहरात डेंग्यू ने थैमान घातले आहे, त्यामुळे शहरातील मुलं आजारी आहे, पांढऱ्या पेशी कमी होणे, 

खवखव, ताप, खोकला , सर्दी ने ग्रस्त होऊन 

किनवट शहरातील रुग्णालय 
तर फुल्ल झाले आहे काहींना आदीलाबाद ,

 नांदेड करिता संदर्भित करण्यात आले आहे. 

एका एका घरातील 4 ते 5 व्यक्ती व मुलं आजारी आहेत एवढे असून देखील 
किनवट नगर परिषदेची आरोग्य यंत्रणा व आरोग्य विभागाच्या आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरली आहे . 

कोणत्याही प्रकारची फवारणी व रोग प्रतिबंधक कारवाई 

करण्यात येत 
नसल्याने उपरोक्त दोन्ही यंत्रणा ह्या शहरातील नागरिकांचा 

या आजारामुळे मृत्यू होण्याची वाट बघत आहेत का ? हा ही प्रश्न उपस्थित होतो 

तर किनवट नगर परिषद मध्ये घनकचरा व्यवस्थापन करणारी यंत्रणा

 कुचकामी ठरली आहे व तो कंत्राटदार बाहेर गावचा असेल परंतु नगर परिषद मधील
 सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी हे गावाचेच आहेत त्यांनी याकरिता उपयोजना करावी

 फक्त ठराविक भागात फवारणी 
करून झाली तर 

सर्व किनवट शहराची फवारणी होत नाही सगळी नागरिक राहतात

 या भावनेने नगर परिषद ने
 काम केले पाहिजे. 

घनकचरा व्यवस्थापन चा कंत्राटदार करत नसेल तर जनरल फंड मध्ये वर्षाला 1.50 कोटी रुपये 

शहरातील नागरिक विविध
 कराच्या स्वरूपात भरतात  ते 
पैसे जातात कुठं 

याचा हिशोब विचारणारी कोणती 
यंत्रणा आहे
 की नाही शहरात ?