Ticker

6/recent/ticker-posts

*देगलूर येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रा.उत्तमकुमार कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर *६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान*


*देगलूर येथे ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त  प्रा.उत्तमकुमार कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर *६६ रक्तदात्यांनी केले रक्तदान*                                
तालूका प्रतिनिधी:                               
---------------------
देगलूर( दि.१५) आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले. यानिमित्त देगलूर येथे 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमीत्त भव्य रक्तदान शिबीराचे 

आयोजन प्रा.उत्तमकुमार कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.
     
 देगलूर तहसिलचे तहसिलदार  विनोदजी गुंडमवार यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 

पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रक्तदान शिबीराचे शुभारंभ करण्यात आले.  

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष लक्षीकांत पदमवार, भाजपा युवामोर्चाचे शहरअध्यक्ष अशोक लालू कांबळे, 

भारतीय जनता पार्टीचे देगलूर- बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीचे इच्छूक उमेदवार प्रा. उत्तमराव कांबळे,  

राष्ट्रवादीचे माजी नगरअध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, पत्रकार महादेव उप्पे सामाजिक कार्यकर्ते तथा 
पत्रकार जावेद अहेमद , प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाअध्यक्ष कैलास येसगे ,विशाल बोरगावकर ,

 शिवसेनेचे तालुकाअध्यक्ष महेश पाटील ,पोलिस निरीक्षक भगवान धबडगे ,नगरसेवक प्रशांत दासरवाड ,

माजी.नगरसेवक शत्रूघ्न वाघमारे,दिगंबर कौरवार ,राहुल पेंडकर ,भाजपा अनुसुचीत जाती मोर्चाचे
 मारोती वाडेकर ,सचिन कांबळे ,राजरत्न सोनकांबळे ,दिपक संगमकर,राज कांबळे ,सतीष भुर्रे ,

सुगत केरूरकर ,प्रशांत नरबाग,अनिल हसनाळकर,संजय कांबळे ,

प्रा.शेरीकर,प्रबुध्द दुगाने,सुनिल वाघमारे,नितीन सोनकांबळे ,पोलिस उपनिरीक्षक जकीकोरे,रवि उल्लेवार 

,विनोद सोनकांबळे ,  पत्रकार मिलींद कावळगावकर 

,कार्यक्रमाचे आयोजक विकास नरबागे सामाजिक कार्यकर्ता, व रक्तदाते उपस्थित होते.
  
 या शिबीराचे औचित्य साधून देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीचे 

भारतीय जनता पक्षाचे इच्छूक उमेदवार प्रा. 
उत्तमकुमार कांबळे यांनी 

स्वातंत्र्य दिनाच्या सर्व जनतेला शुभेच्छा देत या रक्तदानाचे महत्व पटवून दिले. 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दाण आहे.

यात जातपात,धर्म काहीच नसतो. यावेळी त्यांनी एकच आवाहान केले की जात पात विसरून रक्तदान करा, 

या आपल्या रक्तामुळे कित्येक जनाचे जिव वाचू शकतो व याची या काळाला नित्तांत गरज असल्याचे सांगितले. 

या कार्यक्रमाचे आयोजक विकास नरबागे यांनी या कार्यक्रमाचे विशेष महत्व असल्याचे सांगितले. 

दरवर्षी स्वातंत्र्य दिनानिम्मीत वेगवेगळे कार्यक्रम घायचो पण आमच्या मित्रांमध्ये वेगळी संकल्पना आली व या कार्यक्रमाचे आयोजन केले.