Ticker

6/recent/ticker-posts

तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना हटवा अन्यथा आमची इतरत्र बदली करा:- तलाठी संघटने च्या निवेदनाने वादग्रस्त तहसीलदारांची एकाधिकार शाही उघड!तालुक्यातील संपूर्ण तलाठी जाणार १६ ऑगस्टपासून सामूहिक रजेवर


तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांना हटवा अन्यथा आमची इतरत्र बदली करा:- तलाठी संघटने च्या निवेदनाने वादग्रस्त तहसीलदारांची एकाधिकार शाही उघड!


तालुक्यातील संपूर्ण तलाठी जाणार १६ ऑगस्टपासून सामूहिक रजेवर!

माहूर:-  माहूर तालुक्याचे तहसिलदार एस. एम. वरणगावकर यांची बदली करावी किंवा आम्हा सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची बदली 

इतरत्र करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा माहूर च्या वतीने

 सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून २२ तलाठी व मंडळ अधिकारी यांनी केली आहे.
माहूर येथील तहसिलदार एस.एस. वरणगावकर हे मागील सहा वर्षापासून माहूर तालुक्यात नौकरी करत आहेत.

माहूर तालुक्यात त्यांची नियुक्ती नायब तहसिलदार म्हणून झाली होती, परंतु २०१६ साली त्यांच्याकडे प्रभारी तहसिलदार म्हणून पदभार देण्यात आला.

प्रभारी तहसिलदार असताना त्यांनी नियमीत पदस्थापना झालेल्या एकूण चार तहसिलदार यांना परत पाठविले.

तसेच नियमीत तहसिलदार म्हणून बढती झाल्यानंतर पुन्हा ते माहूर येथेच तहसिलदार म्हणून रुजू झाले.

मागील एक महिण्यापासून काही राजकीय लोकांनी त्यांच्या तक्रारी वरिठाकडे केल्या आहेत, 

त्यामुळे तहसिलदार एम.एस.वरणगावकर यांनी गैरसमजातून राग मना मध्ये ठेवत तलाठी व मंडळ अधिकारी यांना मानसीक त्रास देणे सुरू केले आहे.

वरिष्ठांना ही कर्मचाऱ्या बद्दल भडकवून देण्याचे काम त्यांचा कडून सुरू आहे. 
तहसिलदार वरणगावकर यांची भाषा ही अलिकडच्या काळात खूप अर्वाच्य झाली 
असून महिला तलाठी असतानाही 
भाषा खुप घाणेरडी वापरली जाते.

शिवाय तलाठी व मंडळ अधिकारी यांना एकप्रकारे धमकी देणे त्यांच्या कडून सुरु आहे. 

तलाठी बोधे यांचे तर काहीही म्हणणे एकूण न घेता त्याच्या वर गुन्हे नोंद करा असा फर्मान काढला आहे.

 तसेच सर्व तलाठी यांची विभागीय 
चौकशी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

त्यामुळे सर्व तलाठी व मंडळ अधिकारी दडपणाखाली असून एखादा 
अनुचीत प्रकार होवू शकतो. 

आमच्या जिविताम धोका निर्माण झाला आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

याही आगोदर माहूर तहसिल कार्यालयात कार्यरत दोन नायब तहसिलदार यांनी ही तहसिलदार एम.एस. वरणगावकर साहेब यांची तक्रार केलेली होती. 

तसेच माहूर तालुक्यातील राजकीय पक्षकांग्रेस,रा.कॉ. शिवसेना, मनसे प्रहार संघटना तसेच अनेक व्यक्तीगत तकारी करण्यात आलेल्या आहेत.

उपविभागीय अधिकारी कार्यालय माहूर तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या जिवितावास  दुर्दैवाने काही झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी ही तहसिलदार एम. एम. वरणगावकर यांची राहील.

असी तंबी ही तलाठी संघटनेने दिली आहे. माहूर तालुक्याचे तहसिलदार एस.एम. वरणगावकर 

यांची बदली करावी किंवा आम्हा सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांची बदली इतरत्र करावे. तलाठी वर द्वेष भावणेने कार्यवाही करुन नये, 

तसेच तहसीलदार वरणगावकर यांची बदली न झाल्यास माहूर तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी १६ ऑगस्टपासून 

सामुहीक रजेवर जाणार असा इशारा ही तलाठी महासंघाकडून निवेदनात देण्यात आला आहे.

निवेदनावर 
 २२ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

प्रतिनिधी :- सप्पू दोसानी माहूर गड