नगर पंचायतीतील गैरकारभाराच्या
चौकशीसाठी अमरण उपोषणाचा इशारा
अर्धापूर नगर पंचायत पदाधिकारी आणि प्रशासन यांनी एकमेकांना सहकार्य करून
सन २०१४ ते २०२१ या कालावधीत अब्जावधी रुपयांची अनेक विकास कामे केली आहेत.
या सर्व विकास कामात
कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची तीस दिवसात चौकशी करून दोषींविरुद्ध कार्यवाही करा,
अन्यथा नगर
पंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मिर्झ अजहरउल्ला व अत्याचार निर्मूलन अभियान जिल्ह अध्यक्ष खतीब अब्दुल सोहेल
यांनी दि .२५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
अर्धापूर /खतीब अब्दुल सोहेल
नगर पंचायत अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि
विद्यमान राज्याचे सार्वजनिक
बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून
शासनाच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणावर शहराच्या विकासासाठी निधी प्राप्त झाला.
परंतु येथील
मुख्याधिकारी व गुत्तेदार नगर सेवकांनी संगणमत
करुन सन २०१४ ते २०२१ या काळात नगर
पंचायत इमारत दुरुस्ती, चर्मकार,
मातंग, जंगम, वैदु समाज, ब्राम्हण,
मुस्लिम समाजांच्या स्मशानभूमीचे
थातूरमातूर आणि अर्धवट
बांधकाम करून लाखो रुपयांचा
अपहार केला आहे.
तसेच अग्निशमन इमारत बांधकामातील
अपहार, पथदिवे,
नाली, रस्ते बांधकाम, जांभरुन ते अर्धापुर पाणी पुरवठा योजना,दलीत वस्तीतील निधी, घनकचरा
नियोजन, मुरुम टाकणे
आदी विकास कामाच्या नावाखाली नको तिथं, नको तेवढा निधी टाकून सार्वजनिक निधीचा अपव्यय केला
असून काही विकास कामे तर नियम आणि कायदा गुंडाळून
ठेवत स्वतःच्या मर्जीप्रमाणे करून
कोट्यावधी रुपये घशात घातले आहेत.
असा आरोप करण्यात आला असून या संपूर्ण विकास कामाची चौकशी करून दोषींवर योग्य ती कडक कार्यवाही कर वी.
अशा मागणीचे निवेदन
शहरातील सामाजिक कार्यकर्ते
मिर्झ अजहरउल्ला बेग सादुल्ला व अब्दुल सोहेल यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिले आहे.
तसेच येथील नगर पंचायतीच्या विविध विकास
कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे निवेदन माजी उपसरपंच ओमप्रकाश पत्रे यांनीही
सन २०१ ९ मध्ये जिल्हाधिकारी
महोदयांना दिले होते.
यावर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या
प्रकरणातील गांभीर्य लक्षात घेऊन
दि .०१ आगष्ट २०१ ९ रोजी पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत
करुन आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश काढण्यात आले होते.
परंतु या चौकशी समितीने
त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आणि अद्याप पर्यंत तरी कोणतीही चौकशी न करता
भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातल्याची चर्चा असतानाच दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी
मिा अजहरउल्ला बेग यांनी नगरपंचायत प्रशासनाच्या मंजूरीने करण्यात आलेल्या आज पर्यंतच्या
विविध विकास कामांची चौकशी करून सार्वजनिक निधीचा अपहार करणाऱ्या प्रशासकीय
अधिकारी, गुतेदार आणि संबधित यंत्रणा यांच्यावर तीस दिवसाच्या आत योग्य ती
कडक कार्यवाही करावी.
अन्यथा तीस दिवसानंतर नगरपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार
असल्याचे निवेदन जिल्हाधिकारीबनांदेड यांना दिले आहे.
या निवेदनाच्या प्रती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक राव चव्हाण,
खासदार प्रतापराव पाटील
चिखलीकर, कार्यकारी
अभियंता बांधकाम विभाग, जिल्हा नियोजन अधिकारी न. पं.विभाग यांच्यासह सर्व संबंधितांना देण्यात आल्या