Ticker

6/recent/ticker-posts

किनवट पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच महिला PSI म्हणून स्मिता जाधव रूजू ;प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार किनवट बऱ्याच वर्षाच्या मागणीनंतर येथील किनवट पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच


किनवट पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच महिला PSI म्हणून स्मिता जाधव रूजू ;प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार

किनवट(आनंद भालेराव)
बऱ्याच वर्षाच्या मागणीनंतर येथील किनवट पोलिस ठाण्यात पहिल्यांदाच

 महिला PSI म्हणून स्मिता जाधव यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
तसेच नवीन एपीआय म्हणून श्री वाठोरे साहेब रुजू झाले आहेत.

त्यांचा सत्कार प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघाच्या वतीने करण्यात आला.
    

   नांदेड जिल्ह्यापासून  जवळपास दीडशे किलोमीटर लांब असलेल्या किनवट पोलीस ठाण्यात महिला फौजदार नव्हत्या. 

लॉकडॉऊन मध्ये शिथिलता आल्यानंतर आता महाविद्यालय, शाळा, 
खाजगी शिकवणी वर्ग सुरू झाले आहेत. 

अनेक वेळा टार्गेट मुलांकडून विद्यार्थिनींना मानसिक त्रास देण्याचे प्रकार घडत असतात. 

त्यामुळे किनवट पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्यांची नेमणूक आवश्यक होती.
 जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी येथील पोलीस ठाण्यात 

महिला psi सुनिता जाधव यांचे नेमणूक करून विद्यार्थीनीना व महिलांना दिलासा दिला आहे.


संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन येथे जाऊन स्मिता जाधव व श्री वाठोरे साहेब 

यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव तालुका अध्यक्ष आशिष शेळके 
तालुका सचिव नसीर तगाले,
कार्याध्यक्ष  सय्यद नदीम सहसचिव प्रणय कोवे,सहकोषाध्यक्ष मारोती देवकते,

विशाल गीम्मेकर आदी पदाधिकारी
 उपस्थित होते.