Ticker

6/recent/ticker-posts

2 आॅक्ट़ोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय उपोषण. गटविकास अधिकारी साहेब यांना दिले निवेदन.महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना किनवट तालुका कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी

*किनवट प्रतिनिधी.* 
 2 आॅक्ट़ोंबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी ग्रामरोजगार सेवकांचे एक दिवसीय उपोषण
.      

गटविकास अधिकारी साहेब यांना दिले निवेदन.महाराष्ट्र ग्रामरोजगार सेवक संघटना किनवट तालुका कमिटीच्या वतीने महात्मा गांधी जयंती दिनी 

ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्या संदर्भात प़्ंचायत समिती किनवट समोर एक दिवसीय उपोषण करण्यात येत

 असल्याचे निवेदन तालुका संघटनेच्या वतीने माननीय गटविकास अधिकारी साहेब किनवट यांना देण्यात आले आहे.


महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005अंतर्गत स्थरावर रोजगार हमी योजनेचे काम करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांची ग्रामसभेत निवड करण्यात आलेली आहे.
ग्रामरोजगार सेवकांची पुर्णवेळ समर्पित नियुक्ती करण्यात यायला पाहिजे होती,

 परंतु महाराष्ट्र सरकारने 2 मे 2011रोजी शासन निर्णय काढून ग्रामरोजगार सेवकांना 

अर्धवेळ बाह्स्त कर्मचारी म्हणून नियुक्त करून कामाच्या आधारावर

 2.25%ते4.50% 6%पर्यंय तुटपुंज्या मानधनावर काम करण्यासाठी भाग पाडले आहे.

महाराष्ट्रातील रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या 

ग्रामरोजगार सेवकांना कोणत्याही प्रकारचे टिए,डिए, देण्यात येत नाहीत.

मनरेगा अंतर्गत काम करणारे मजूर पुर्णवेळ, 

पण त्या मजुरांवर दिवसभर लक्ष देवून काम करून घेणारे ग्रामरोजगार सेवक मात्र अर्धवेळ, बाह्स्त कर्मचारी.


रोजगार हमी योजनेचा जनक असलेल्या राज्यात काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवक

 यांच्या वर अन्याय सुरू आहे.
सहा सहा महिने तुटपुंजे मानधनही पदरी पडत नाही.

प्रवास भत्याचा पत्ता नाही, लागणारी सामग्री कुठे अडकली याचा बेत नाही.

स्वतंत्र कक्ष उभे करण्याचे नियोजन हवेतच उडाले अशा एक ना अनेक 

अडचणी असुन त्यास अनखिन भर म्हणून स्थानिक पातळीवर चे राजकारण,मग काम करावे तरी कसे, 

या व इतर मागण्या संदर्भात महात्मा गांधी जयंती दिनी महाराष्ट्रभर आंदोलन होत 

असुन त्या अनुषंगाने किनवट येते ही आंदोलन होणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी उपस्थित,किनवट तालुका ग्राम रोजगार सेवक संघटना अध्यक्ष मा.गेमसिंग जाधव,मधुकर गवले, 

बापूराव वावळे, राहुल पाटिल, पुंडलिक घुगे, नामदेव सावरकर,ज्ञानेश्वर मुंडे,अरूण राठोड,मनोज केंद्रे, 

बालाजी राठोड,किरण राठोड, संजय राठोड,राम जाधव, साहेबराव दार्लावार, 

अशोक जाधव तालुका किनवट ग्रामरोजगार सेवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.