Ticker

6/recent/ticker-posts

आज रात्री दिनांक 5-9-2021 रोजी चिखली किनवट रोडवर गस्त करत असताना दुधगाव फाट्याजवळ रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान 6 सायकली अंधाराचा फायदा घेत काही सायकलवर सागी कटसाईज लाकडे व काही तैयार फर्निचर लाकडे सायकल ला बांधून


आज रात्री दिनांक 5-9-2021 रोजी चिखली किनवट रोडवर गस्त करत असताना दुधगाव 

फाट्याजवळ रात्री 2:30 वाजेच्या दरम्यान 6 सायकली अंधाराचा फायदा घेत काही 

सायकलवर सागी कटसाईज लाकडे व काही तैयार फर्निचर लाकडे सायकल ला बांधून 

किनवट च्या दिशेने येत असताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला

 असता सहा सायकली सोडून लाकूड तस्करांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला या कारवाईमध्ये 

माननीय सहाय्यक वनसंरक्षक श्री जी डी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली 

वनपरिक्षेत्राधिकारी श्री पी एल राठोड यांच्या नेतृत्वात ही कारवाई श्री वनपाल रवी 

दांडेगावकर वनरक्षक बालाजी झंपलवाड अनिल फोले सिद्धार्थ वैद्य श्री चिभडे एस डी 

खामकर तसेच वनमजूर सलाउद्दीन हुसेन पठाण बालाजी कराड व वाहन चालक 

बाळकृष्ण आवले यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली. 

सदर कार्यवाही मध्ये जप्त केलेले सागी कटसाईज नग 201 घ. मी.  0.7300 किंमत  45470/- व  6 सायकल  ची  किंमत 3000/- एकूण  48470/- इतकी आहे.