सर्व जागरुक मतदारांना जय* *संविधान जय भारत* । आपणास स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली.
पुर्वी आपण इंग्रजांचे गुलाम होतो आज आपण शासन आणि प्रशासनचे गुलाम बनून राहिलो आहोत.
आज पर्यंत आम्हि फक्त मतदान करण्या पलीकडे लोकशाही अनुभवली आहे का?
काहि मतदार विकले जातात त्याचे नुकसान सामान्य मतदारास भोगावे लागते.
लोकशाही आणि संविधानाने आम्हास दिलेल्या अधिकार आणि हक्काचा उपभोग आम्हास हे
राजकारणी मंडळी घेऊ देतात का क्षेत्रसभा हा आमचा हक् आहे प्रशासकिय कार्य कसे असावे आम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे
हे ठरवणारे आम्हि मतदार की पाच वर्षाचा आमचा नोकर हेच आपणास समजलेले नाही.
स्वप्रसिध्दी करीता केली जात असलेली बँनरबाजी, भोंगे घेऊन केलेले काम हे आमच्या
घामाच्या पैशाचे आहे याची उधळपट्टी करून संकल्पना च्या नावाने बसस्टाप वर स्वतःचे फोटो लावणे दवाखाना, लायब्ररी,
पाण्याची टाकी चौक यावर संकल्पना फलके लावणे हे असंविधानीक असतानाहि कोणी यावर अक्षेप घेत नाही याचे आश्चर्य वाटते.
शहराचे होणारे सिमेंटचे जंगले यातच भर म्हणून अनधिकृत दहा दहा मजली इमारती याला
राजश्रय कोण देतो हेचना ज्यांना आपण आपला प्रतिनिधी निवडू दिला तो.
पाण्याच्या पाण्यापासून ते ड्रेनेज,
कचरा रस्ते याची काय दशा आहे हे आपण अनभवताच परंतु प्रश्न विचारण्याची आपली हिम्मत होत नाही. अब्जो रुपयांचा निधी जातो कुठे?
तसेच आपण येथील महाराजा असल्याचे आव आणत कुठल्याही गोष्टीची परवानगी न घेता रस्तयावर महिनोंनमहिने मंडपे टाकून वाहतूकीस आडथळा विजचोरी,
महसूल बुडविणे हे यांचे नित्याचेच वर आपणावरच रूबाब आणि उपकार बघा आम्हि कीती कार्यक्षम आहोत
आपणासाठी रस्ता ड्रेनेज केले प्रभागात.
सुधारणा केल्या.
खरेच यांना आपला पुळका असेल तर आपल्या खिशातून शंभर रूपये खर्च करून दाखवू देत तरच खरे हे कार्यक्षम.
आपल्या हक्क आणि अधिकार या करीता दिनांक 21/09/2021 रोजी पासुन पुणे मनपा
येथे इनक्रेडिबल समाजसेवक गृप व अन्य समविचारी संस्थेच्या पाठिब्यातून "अमरण उपोषण "
असलम इसाक बागवान करणार असून जर आपण कोणाचे गुलाम अथवा आपण आपणास काहि रूपयांकरीता विकले गेले नसाल तर आवश्य आपला हक् मागण्याकरीता सामील व्हा।
जय संविधान। जय भारत।।