Ticker

6/recent/ticker-posts

सत्य निर्मिती महिला मंडळाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी किनवट येथील सामाजिक कार्यकर्त्या शेख परवीन यांची निवडकिनवट (परवीन शेख) सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असलेल्या


सत्य निर्मिती महिला मंडळाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी किनवट येथील सामाजिक कार्यकर्त्या शेख परवीन यांची निवड
किनवट (परवीन शेख) सामाजिक क्षेत्रात 

सदैव अग्रेसर असलेल्या  तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या सत्य निर्मिती महिला मंडळाच्या

 नांदेड जिल्हा अध्यक्ष पदी किनवट येथील सामाजिक कार्यकर्त्या परवीन शेख खलील यांची निवड करण्यात आली 

असून उपाध्यक्षपदी मनीषा चौधरी,तालुकाध्यक्षपदी जयश्री भरणे तर सचिवपदी रजिया शेख यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल नांदेड 

जिल्ह्यातील महिला मंडळे व सामाजिक  संघटनाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सत्य निर्मिती महिला मंडळ उमरखेड ही 

संघटना राष्ट्रीय स्तरावर सामाजिक क्षेत्रात काम करणारी संघटना म्हणून ओळखली जाते 

महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा देण्याचे काम संघटना राष्ट्रीय स्तरावर करत आहे 

 दरम्यान किनवट येथील सामाजिक कार्यकर्त्या परवीन शेख खलील, 

 मनीषा चौधरी जयश्री भरणे, रजिया शेख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन 

संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष शबाना खान यांनी संघटनेची नांदेड जिल्हा कार्यकारिणी  गठित  करण्यासाठी 8 सप्टेंबर रोजी 

किनवट येथे माजी नगराध्यक्ष  इसाखान सरदार खान यांच्या निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक घेतली 

या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील महिलावर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर चर्चा करण्यात आली तसेच संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्याचे ठरले. 

बैठकीत सत्य निर्मिती महिला मंडळाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली 

असून राष्ट्रीय अध्यक्ष शबाना खान यांच्या आदेशानुसार संघटनेच्या 

नांदेड जिल्हा अध्यक्षपदी परविन शेख यांची निवड करण्यात आली तर नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी मनीषा चौधरी,

 किनवट तालुका अध्यक्षपदी जयश्री भरणे तसेच सचिवपदी रजिया शेख यांची एकमताने निवड करण्यात आली 

याप्रसंगी ईसाखान सरदारखान गंगारेड्डी  बैनामवार,आली  सेठ  यांची उपस्थिती होती.

यावेळी इसाखान सरदार खान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना संघटनेचे ओळखपत्र देण्यात आले.
 

 मागील दहा ते पंधरा वर्षापासून मी किनवटसारख्या मागास व दुर्गम भागात महिलांच्या हितासाठी काम करत आहे. 

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महिलावर होणाऱ्या कौटुंबिक व ईतरअन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. 

माझ्या या कार्याची सत्य निर्मिती महिला मंडळाने दखल घेऊन माझ्यावर संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. 

ही जबाबदारी निस्वार्थपणे पार पाडण्यास मी कटिबध्द आहे अशा प्रतिक्रिया शेख परवीन यांनी नियुक्तीनंतर दिल्या आहेत 

या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनेकडून शेख परविन, 

मनीषा चौधरी, जयश्री भरणे व रजिया शेख यांचे अभिनंदन होत आहे