Ticker

6/recent/ticker-posts

*दिन दहाडे डकेती करून ५५ वर्षीय महातारीशी छेडछाडचा खोटा आरोप लावून माझी फसवणूक केली


दिन दहाडे डकेती करून ५५ वर्षीय महातारीशी छेडछाडचा खोटा आरोप लावून माझी फसवणूक केली.

बुलढाणा / प्रतिनिधी :- दि. १३ जून २०२१ रोजी खोट्या आरोपावरून व फसवणूक करून आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत 

दाद मागण्यासाठी पत्रकार वहीद खान यांची मानवाधिकार आयोगात धाव घेतली आहे.

केपी न्यूजशी बोलताना खान म्हणाले की, मी वहीद गफ्फार खान दैनिक भारत संग्राम चांदुर बिस्वा प्रतिनिधी आहे आणि समाज सेवेचे अनेक कार्य करीत आहे. 

माझे वय ३५ वर्ष असून एक ही सिव्हिल व क्रिमिनल गुन्हा माझ्या विरुद्ध दाखल झालेला नाही. 

१३ जून २०२१ रोजी खोट्या आरोपावरून व फसवणूक करून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


अताउल्लाह खान आणि शाकीर उल्ला खान यांच्या दरम्यान टॉयलेटची जागेवरून वादविवाद बऱ्याच दिवसांपासून चालत होता.

अताउल्लाह खान व परिवार हे शाकीर उल्लाह खानला खोट्या आरोपात फसविण्याच्या धमक्या देत होत्या

 त्याची लिखित तक्रार वारंवार ठाणेदार साहेब नांदुरा, जिल्हा पोलिस अधिक्षक बुलढाणा व वरीष्ठ अधिका-यांना केलेली आहे.


दि. १३ जून २०२१ ला घटनेच्या वेळी मी माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात होतो, 

लग्नात उपस्थित लोकांनी सांगितले की रविवारच्या साप्ताहिक बाजारात काही वादविवाद झाला आणि पोलिस पण आली आहे,

 दैनिक भारत संग्रामचा प्रतिनिधी म्हणून मी तेथे गेलो आणि ज्या वेळी मी घटनास्थळी पहोचलो 

त्या ठिकाणी मनोहर बोरसे (ASI) आणि प्रवीण मानकर ( API ) व इतर पोलिस उपस्थित होते, मोबाईल कॅमेरामध्ये हे व्हिडिओ रेकॉर्ड आहे.

शाकीर उललाह खान आणि अताउल्लाह खानचे दरम्यान जागे (टॉयलेट) च्या वादात माझे काही ही घेणे देणे नाही होते. 

दि. २८ एप्रिल २०२१ रोजी शाकीर खानला धमकावून दबावात घेण्यासाठी अताउल्लाह खानचे इशाऱ्यावर 

शाकीर खानच्या घरात विना तक्रारी घुसून पोलिसांनी बेकायदेशीर चौकशी केली होती 

आणि पवित्र कुराणला काळे जादूची पुस्तक घोषित केले होते, 

पवित्र कुराणची अपमानजनक घटनाची चौकशीसाठी १०० पेक्षा जास्त गावकऱ्यांनी गृह मंत्री (महाराष्ट्र राज्य) 

यांना हस्ताक्षर करून पत्र पाठविले आणि शाकीर उल्लाह खान वर झालेल्या अन्यायाची मी दैनिक भारत संग्रामला बातमी लावली, 

यावर चिडून अताउल्लह खाननी पोलिसांची मदतीने खोट्या आरोप खाली फसवणुकचा षडयंत्र रचला, 

दिन दहाडे डकेती करून ५५ वर्षीय महातारीशी छेडछाडचा खोटा आरोप लावून माझी फसवणूक केली. 

या षडयंत्रमध्ये सामील सर्व व्यक्तींची चौकशी करून नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी व मला न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे,

 अशी विनंती आपण मानवाधिकार आयोगाकडे केली असल्याचे सांगितले.