Ticker

6/recent/ticker-posts

कास्मॉपॉलिटन विद्यालयात आमदार भीमराव केराम यांचे हस्ते शिक्षक दिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व मुलींना सायकल वाटप


कास्मॉपॉलिटन विद्यालयात आमदार भीमराव केराम यांचे हस्ते शिक्षक दिनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व  मुलींना सायकल वाटप 


किनवट : येथील कॉस्मॉपॉलिटन विद्यालयात शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार भीमराव केराम यांचे हस्ते 

पंचायत राज समिती दौरा पूर्व तयारीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार,

 शाळेतील  शिक्षकांना शिक्षक पुरस्कार व मानव विकास कार्यक्रमांतर्गत 

मुलींना सायकल वाटप कार्यक्रम पार पडला.
     

  मुख्याध्यापक दिगंबर बिच्चेवार अध्यक्षस्थानी होते ; 

तर प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले, 

कॉस्मॉपॉलीटन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेव रामतीर्थकर, सचिव प्रल्हाद रामतीर्थकर, 

भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, नगरसेवक प्रतिनिधी
 बालाजी धोत्रे, पर्यवेक्षक वाय. एम. राठोड, मारोती भरकड, जे. टी. पाटील उपस्थित होते.
       

 मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णण 

यांच्या प्रतिमेस पुष्पार्पूण कार्यक्रमास प्रारंभ झाला. बाळकृष्ण कदम 

यांनी प्रास्ताविक व राजू बोलेनवार यांनी सूत्रसंचालन केले. विदेशकुमार पुराणीक यांनी आभार मानले.
      
पंचायत राज समिती दौरा यशस्वी करण्यासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल शाळेचे माजी विद्यार्थी उत्तम कानिंदे, राम बुसमवार व 

विषय तज्ज बाबुराव इब्बितदार यांना आणि शाळेतील कला शिक्षक शिवराज बामणीकर, 

रमेश बारापात्रे व अर्चना खडसे यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने आमदार भीमराव केराम यांचे हस्ते गौरविण्यात आले. 

त्यानंतर शाळेतील 19 मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.

 यावेळी आमदारांचे जनसंपर्क अधिकारी संतोष मरसकोल्हे, गिरीधर नैताम, बालू कवडे उपस्थित होते.
      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक रावसाहेब घोरबांड, बालाजी मोहिते, इंद्रदीप वाघमारे, 

संतोष आगरमोरे, कैलास जाधव, प्रकाश कदम, आनंदरश्मी कयापाक, अमोल बेलखेडे, 

लक्ष्मण वाडगुरे, गंगाधर जाधव, संजय गरुडे, सुनिता गज्जलवार, ममता देशमुख, मनीषा चक्करवार, विद्या देशपांडे, 

अर्चना चनमनवार, प्रीती वरघंटे, निता आरपेल्लीवार, ज्योती जोशी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी रमेश बंड्रेवार, 

प्रकाश हुलकाणे, देविदास चंचलवार आदिंनी परिश्रम घेतले.