Ticker

6/recent/ticker-posts

पुसद शहर एकदा पुन्हा तरुणाच्या हत्येने हादरले, पुसद शासकीय दवाखाना च्या कमानी समोर रोडच्या कडेला मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आली, मनोज सवंगडे वय २१ रा, भीमनगर श्रीरामपूर असे मृत तरूणाचे नाव आहे


पुसद शहर एकदा पुन्हा तरुणाच्या हत्येने हादरले, पुसद शासकीय दवाखाना च्या कमानी समोर रोडच्या कडेला मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आली,

 मनोज सवंगडे वय २१ रा, भीमनगर श्रीरामपूर असे मृत तरूणाचे नाव आहे, 
 
अधिक माहिती अशी की
शहरातील सरकारी दवाखान्याच्या 

कमानीजवळील रोडवर एका 25 वर्षीय 
तरुणाची हत्या झाली. 

ही हत्या काल रात्री अं. 9 ते 9.15 च्या
 दरम्यान झाल्याचे समजले आहे. 

मृतक तरुणाचे नाव मनोज सवंगडे वय अं. 25 वर्ष रा. भीमनगर श्रीरामपूर पुसद असे आहे. 
ही हत्या जुन्या आपसी वादातून झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरुणाच्या पाठीवर 7 ते 8 घाव मारल्याचे सुद्धा दिसून आले आहे. 

तसेच या तरुणाला 10 ते 15 जणांनी मारल्याची चर्चा सर्वत्र सुरु असून ते आंबेडकर वॉर्डामधील 

असल्याचे सुद्धा संशय व्यक्त केल्या जातं आहे. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. 

या घटनेचा तपास शहर पोलीस स्टेशन चे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला आणि त्यांची टीम करत असून या घटनेने सर्व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

तसेच पुसद शहरात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे. 

ही वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरल्याचे चित्र सुद्धा दिसून येत आहे.