आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवणार… प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व जागा लढवणार… प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे.
आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुक 2022 च्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी कार्यकर्ता मेळावा
व मार्गदर्शन शिबिर निगडी येथील तारांगण हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते.
आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता कार्यकर्त्यांनी संघटना बांधणी,
निवडणूक रणनीती आणि परिवर्तनाचा नेमका कार्यक्रम या त्रिसूत्रीवर भर द्यावा,
तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व जागा आम आदमी पार्टी ताक्तींनिशी लढवणार असल्याचे
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शना वेळी सांगितले..
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील वाढलेला भ्रष्टाचार जनतेच्या कर रुपी पैशावर डल्ला
मारणाऱ्या भाजप सत्ताधाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवून देईल,
आम आदमी पार्टी भ्रष्टाचार विरोधात कायम असल्याचे प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी सांगितले..
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष किशोर मध्यंन, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत या मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
महापालिकेत यश मिळवण्याच्या दृष्टीने आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहरासाठी नविन शहराध्यक्ष लवकरच निवडण्याची शक्यता आहे,
शहराध्यक्ष पदासाठी चेतन बेंद्रे, वहाब शेख, वैजनाथ शिरसाट, महेश बिराजदार इच्छुक असल्याचे समजते
काही नवीन कार्यकर्त्यांचे आम आदमी पार्टीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश घेण्यात आले.
यावेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड चे शहराध्यक्ष अनुप शर्मा,
सामाजिक न्याय विंग च्या अध्यक्ष यशवंत कांबळे, पिंपरी-चिंचवड महिला अध्यक्ष स्मिता पवार,
सचिव किशोर जगताप, प्रवक्ते कपिल मोरे, कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट,
पुणे जिल्हा युवा अध्यक्ष चेतन बेंद्रे, उपाध्यक्ष महेश बिराजदार, स्वप्नील जवळे,
नंदू नारंग, चांद मुलानी, विजया अबाड, मुकेश रंजन, एकनाथ पाठक प्रवीण शिंदे ,