Ticker

6/recent/ticker-posts

हुताम्यांनी दिलेल्या बलिदानाची समाजाने जाणीव ठेवावी-खासदार हेमंत पाटील


हुताम्यांनी दिलेल्या बलिदानाची समाजाने  जाणीव ठेवावी-खासदार हेमंत पाटील  


हिमायतनगर /नांदेड : ज्या वीरांनी  स्वत:च्या कुटूंबाची काळजी न करता देशसेवेसाठी स्वत:ला वाहुन घेवुन प्राणाची आहुती दिली. त्यांच्या विचारांची, कार्याची बलिदानाची जाणीव समाजाने कायम ठेवावी असे 

प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी हिमायतनगर येथे आयोजित स्वातंत्र्ययोध्दा 

"वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळयाच्या अनावरण करण्यात आले .
       

मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.   

मराठवाडयात ठिकठिकाणी  वीरांना अभिवादन केले जाते, 

 खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिमायतनगर येथे आयोजित कार्यक्रमात हुतात्म्यांना अभिवादन केले.

  यावेळी  त्यांच्या हस्ते स्वातंत्र्ययोध्दा "वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपनेकर" यांच्या अर्धाकृती पुतळयाचा अनावरण करण्यात आले.  

येथील मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या  संकूलात आयोजित कार्यक्रमात माजी गृहराज्यमंत्री माधवराव  किन्हाळकर , माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील, आ. माधवराव  जवळगावकर ,

 गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री पाटील , जेष्ठ संचालक राम भारती गणपत भारती, अरुण कुलकर्णी, प्राध्यापिका अरुणाताई कुलकर्णी, प्राचार्या उज्ज्वला सदावर्ते, 

गजानन रणखांब, उपप्राचार्य एल. टी. डाके, तहसीलदार गायकवाड साहेब, पोलीस निरीक्षक कांबळे ,  

हिमायतनगर तालुका प्रमुख राम ठाकरे, काँग्रेस तालुका प्रमुख विकास पाटील देवसरकर,
 भाजप हिमायतनगर तालुका प्रमुख आशिष सकवान, भाजप युवा जिल्हा प्रमुख राम सूर्यवंशी, जि.प.सदस्य सुभाष आत्मा राठोड , 

माजी जिप सदस्य लक्ष्मणराव शक्करगे,माजी बांधकाम सभापती प्रतापराव देशमुख सरसमकर , 

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सकसे , महावीर शेठ , शिरशिरमाळ, हेमलताताई  पाटिल, करूणाताई पाटिल,  आदी मान्यवर उपस्थित होते. 
            यावेळी बोलतांना खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, स्वातंत्र्य लढा हा पुढच्या पिढी साठी प्रेरणादायी असतो त्यामुळे आपण स्वातंत्र्य लढ्याचे आणि क्रांतिकारक ,

 वीर हुतात्म्यांचे स्मरण करून आपल्या येणाऱ्या पिढीला त्याची जाणीव करून द्यायची असते त्यांना आपला इतिहास सांगितला पाहिजे तो पुढे रुजवत नेला पाहिजे हीच आपली संस्कृती आहे . 

आज याठिकाणी वीर योद्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे माझ्या हस्ते अनावरण होत आहे 

हे माझ्यासाठी खूप  सुदैवाची  बाब असून हे करण्याचे भाग्य मला लाभले  याबद्दल मी सदैव कृतज्ञ आहे . 

हुतात्म्यांचे स्मरण म्हणून इस्लापूर येथे भव्यदिव्य स्मारक उभारण्याचे  आश्वासन खासदार हेमंत पाटील यांनी दिले.  

कार्यक्रमाला परिसरातील जेष्ठ नागरिक यांच्यासह आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती