अंबाडी (प्रतिनिधी) किनवट तालुक्यातील मौजे अंबाडी ग्रामपंचायतच्या वतीने आज येथील सांची बौद्ध विहारसाठी पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत मंजूर झालेल्या पेवर
ब्लॉकच्या कामाचा सरपंच कु वंदना गेडाम यांच्या हस्ते कुदळ मारून शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे अंबाडी शाखाअध्यक्ष सतीश गिरीधर पाटील (महाराज )
हे होते तर ग्रामसेवक व्ही एम राठोड, ग्रामपंचायत सदस्या अंबिका कानींदे, नितीपा देठे, जयतुबाई दडंजे,
विजय दडंजे, माजी सदस्य किसन गेडाम,श्रावण घुले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
किनवट तालुक्यातील आंबाडी ग्रामपंचायतसाठी चालू वर्षी 15 वा वित्त आयोगाचा निधी लोकसंख्येच्या प्रमाणात मंजूर झाला
असून हा निधी येथील सांची बौद्ध विहाराच्या पेवर ब्लॉकच्या कामासाठी खर्च करण्याचा निर्णय ग्रामपंचायत घेतला आहे.
त्यानुसार आज सरपंच कु वंदना गेडाम यांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला.
अंबाडी ग्रामपंचायत नेहमीच विकास कामे वेगाने करत आलेली आहे.
या ठिकाणी भव्यदिव्य बुद्धविहार मागील कित्येक वर्षांपासून अस्तित्वात आहे.
या विहाराच्या सुशोभीकरण भर पडावी तसेच विहाराच्या प्रांगणात बसण्याची उत्तम प्रकारे व्यवस्था व्हावी
या हेतूने आम्ही 15 वा वित्त आयोगाचा निधी पेवर ब्लॉकच्या कामासाठी वापरण्याचे ठरविले आहे.
गावाच्या विकासासाठी येथील नागरिक ग्रामपंचायतला नेहमीच सहकार्य करत असतात.
गावकऱ्यांच्या सहकार्यामुळेच अंबाडी गाव आदर्श गाव म्हणून नावलौकिक पावले
असे प्रतिपादन सरपंच वंदना गेडाम यांनी यावेळी बोलताना केले.
या कार्यक्रमाला भीमराव कानींदे, संघर्ष भवरे, पंकज भवरे, अतुल तामगाडगे, पोचीराम भवरे, अलकाबाई कानींदे,