Ticker

6/recent/ticker-posts

किनवट ता प्र दि १५ सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने राज्यात ओ.बी.सी आरक्षण शिवाय होऊ घातलेल्या सहा जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता पक्षातर्फे आ.भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष शिवा क्यातमवार


किनवट ता प्र दि १५ सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने राज्यात ओ.बी.सी आरक्षण शिवाय होऊ घातलेल्या सहा जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन 

भारतीय जनता पक्षातर्फे आ.भिमराव केराम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष शिवा क्यातमवार 

यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे महामहिम राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना तहसिलदार किनवट यांच्या मार्फत सादर करण्यात आले.


भाजपा ओबीसी आघाडी तर्फे सादर करण्यात आलेल्या निवेदनात राज्य सरकार 

विरुद्ध तिव्र संताप व्यक्त करण्यात आला असुन राज्याचे तिन आघाडीचे सरकार हे 

ओबीसींच्या आरक्षणावर गदा आणु इच्छीत आहे असे हि आरोप करण्यात आले आहे. 

राज्य शासनाने ओबीसींची योग्य ती बाजु सुप्रिम कोर्टात न मांडल्याने 

आज ओबीसींना राजकिय आरक्षणाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे तर राज्याचे सरकार या बाबत ठोस भुमिका मांडत नसल्याने व राज्य सरकाच्या मंत्र्यांमध्ये 

एकवाक्यता नसल्याने आज ओबीसी समाजावर हि वेळ आली आहे 

अशी ही भावना सादर केलेल्या निवेदनातुन व्यक्त करण्यात आली आहे.


राज्य सरकार ने योग्य कायदेशीर प्रक्रीयेव्दारे ओबीसींना राजकिय आरक्षण

 पुन्हा मिळवुन द्यावे अन्यथा राज्य शासना विरुध्द तिव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल 

व जनता आगामी निवडणुकीतुन योग्य ती जागा दाखवेल असा इशारा ही निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.


आ. भिमराव केराम, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष बाबुराव केंद्रे, ता. अध्यक्ष संदिप केंद्रे, भाजपा शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, 

ओबीसी ता. अध्यक्ष शेखर चिंचोळकर, फेरोज तवर यांच्या स्वाक्ष-या आहेत तर यांच्यासह सौ.सुरेखा घाटकर,

 सौ मनिषा चौधरी, जितेंद्र कुलसंगे, प्रकाश कुडमेथे, रामेश्वर किशन गुर्नुले, शेंदुपान मुनेश्वर, 

स्वागत आयनेनिवार, उमाकांत क-हाळे पाटील यांच्यासह अनेक भाजपा ओबीसी आघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिका-यांची उपस्थिती होती.