Ticker

6/recent/ticker-posts

मनसेच्या आंदोलनाने माहूरगड दणाणले*माहुर(प्रतिनिधी)लॉकडाउनमुळे मागील दोन वर्षापासून बंद असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर येथील आई रेणुका माता मंदिरासह सर्व मंदिरे खुली करून भाविकांना देवाचे दर्शन घेऊ द्यावे


*मनसेच्या आंदोलनाने माहूरगड दणाणले*

माहुर(प्रतिनिधी)लॉकडाउनमुळे मागील दोन वर्षापासून बंद असलेल्या तीर्थक्षेत्र माहूर येथील आई रेणुका माता मंदिरासह सर्व मंदिरे खुली करून भाविकांना देवाचे दर्शन घेऊ द्यावे  

या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज माहूर येथील रेणुकामाता मंदिराच्या

 पायथ्याशी घंटानाद आंदोलन करून राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली 


महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाउन लागू केला होता 

दरम्यान मागील तीन ते चार महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे 

लॉकडाउन बऱ्याच अंशी शिथिल करण्यात आले बाजारपेठा, दुकाने, शासकीय कार्यालये, हॉटेल,सार्वजनिक वाहतूक, 

बियरबार यासह देशी दारूच्या दुकानानाही मुभा देण्यात आली परंतु समस्त मानव जातीचे श्रद्धास्थान व आशास्थान असलेली 

मंदिरे मात्र मागील दोन वर्षापासून बंद ठेवली आहेत देशातले सर्वच व्यवहार सुरू झालेले असताना मंदिरेच बंद का? 

असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून

 आज माहूर येथील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या आई रेणुकामाता मंदिराच्या पायथ्याशी

 मनसेचे माजी तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महाराष्ट्र सैनिकानी घंटानाद करून शासनाचे लक्ष वेधले 

यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारच्या हिंदूविरोधी धोरणाचा निषेध करत राज्य सरकार मुर्दाबाद! राज्य सरकार मुर्दाबाद! 

अशी जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनकर्त्यांच्या या घोषणाबाजीमुळे संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला होता 

लॉकडाउनच्या नियमातून सर्वांनाच सूट दिली मात्र मंदिरे बंद ठेवून राज्य सरकार जनतेच्या ईश्वराप्रती असलेल्या 

श्रद्धेला व आस्थेला ठेस पोहोचवण्याचे काम करत असल्याचा आरोप  नितिन मोहरे यांनी यावेळी बोलताना केला असून सरकारने 

भाविकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ मंदिरे खुली करून जनतेला देवाचा आशीर्वाद घेऊ द्यावा अन्यथा यापुढे 

मनसेच्या वतीने खळळ खट्याक सारखे उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे 

या आंदोलनात मनसे चे माजी तालुकाध्यक्ष  गजानन कुलकर्णी, राम दातीर, अनिल इरावार, प्रसाद भंडारे,गणेश कर्णेवार,प्रदीप दोनकोंडवार, 

वैभव कदम,आकाश गुंजकर,अभिषेक गुंजकर, लक्ष्मीकांत भोंबरगे, मुकुंद गुंजकर,अनंता सोळंके, राहुल बत्तलवार, वैभव गंधे, श्रीनिवास नुकलवार,

 रवी आंबटवार, महेश वाघाडे, श्रीकांत मरस्कोल्हे, शंकर आडे, आकाश पवार, निरंजन पवार, अक्षय राठोड,मुकेश पवार, 

युवराज खासदार, काशिनाथ गायकवाड, आशिष बाळसकर, प्रकाश पळसकर,युवराज जाधव,

यांच्यासह असंख्य नागरिक व व्यापारी सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होउ नये 

यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नामदेव रीठे स पो नि जाधव, 

गोपनीय शाखेचे खामंनकर, शेख गनी,पिटलेवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता