Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून खासदार हेमंत पाटील गहिवरले


अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची  पाहणी करून खासदार हेमंत पाटील गहिवरले !
-----------------------------------
 हिंगोली:  परतीच्या पावसाने हिंगोली लोकसभा मतदारसंघात मोठा हाहाकार उडवून दिला चार दिवस झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकाचे मोठे नुकसान  झाले आहे 

 खासदार हेमंत पाटील यांनी संपूर्ण मतदार संघाचा दौरा करून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली 

असता शेतकऱ्यांचे दुःख पाहून त्यांना गहिवरून आले . 

खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत राज्य सरकारकडे मागणी केली 

असून  केंद्राने सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी केंद्रीय कृषीराज्यमंत्री कैलाश चौधरी यांची भेट घेतली.
  

 हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी , वसमत , हिंगोली , सेनगाव ,औंढा , नांदेड जिल्ह्यातील किनवट , माहूर, हदगाव, हिमायतनगर , 

आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात प्रचंड मोठ्या 

प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला खरिपाच्या पिकाचा घास हिरावला गेला. 

 यामध्ये सोयाबीन, हळद. तूर. मूग. उडीद , कापूस हि पिके मातीमोल झाली आहेत .

 खासदार हेमंत पाटील यांनी तातडीने हिंगोली जिल्ह्याचा दौरा करून नुकसान ग्रस्त शेतीच्या भागाची पाहणी केली . 

जगाचा पोशिंदा शेतकरी राजा बद्दल मनातून तळमळ असलेल्या खासदार हेमंत पाटील या लोकनेत्याला शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि दुःख पाहून गहिवरून  आले.

 त्यांनी तातडीने सर्व भागाचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी निर्देश दिले 

यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसिलदार मयूर खेंगळे, 

कृष्णराव पाटील जरोडेकर, माजी सभापती गोपू पाटील, संचालक भरत देसाई,

 उपतालुकाप्रमुख चांदु भिसे , सरपंच सोनु देशमुख,सचिन पेंढारकर, संतोष काळे ,सुजय सूर्यवंशी, 

मधुकर कोल्हे, सरपंच खंडू काळसरे, किरण जगताप, नाना पठाण, दिपक पतंगे, संदीप देशमुख,

 वैभव शिंदे, दादाराव चौतमाल, स्वप्नील देशमुख, गंगाधर पावडे, गावकरी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.