Ticker

6/recent/ticker-posts

देशाला स्वातंत्र्य मिळूनही ७० वर्षांपासून महागांव विकासाच्या बाबतीत गुलामगिरीतच,प्रत्येक बाबीसाठी करावा लागतो संघर्ष


देशाला स्वातंत्र्य मिळूनही ७० वर्षांपासून महागांव विकासाच्या बाबतीत गुलामगिरीतच,प्रत्येक बाबीसाठी करावा लागतो संघर्ष 

शेगांव : विकासाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी घोषणांचा पाऊस पाडला जातो यातच चलतीच्या राज्यकर्त्यांच्या 

गावांची सोय होते. तर कोणत्याही प्रकारचा राजकीय वशिला नसलेल्या गावांना विकासासाठी नेत्यांची मनधरणी करून 

त्यांच्या मागे लागून विकासाचा प्रसाद आपल्या पदरी पाडून घ्यावा लागतो परंतु महागाव हे 

गाव जवळपास पाचशे लोकवस्तीचे गाव असून या गावातील ग्रामस्थांना विकासाचे त्यांचे स्वप्न या जन्मात तरी पूर्ण होईल

 काय अशी शंका येत असून गावातील कुणी दगावला तर त्या गावालगत असलेल्या नदीवर नदीमध्ये पाणी असेल आणि पूर असेल तर त्या मृतदेहाला 

घरातच दोन दिवस ठेवण्याची यांच्यावर पाळी येते दर वेळेस निवडणुका आल्या कि नेत्यांकडून मोठमोठी आश्वासने दिल्या 

जातात आणि निवडणुका झाल्या की हे नेते सोयीस्करपणे विसरतात यातील अनेक लोकप्रतिनिधी मंत्री व राज्यकर्त्यांना हे गाव कोठे आहे 

याची कल्पना नसून या गावातील जनता मात्र विकासाच्या प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करीत असते या ग्रामस्थांच्या जीवनातील हा संघर्ष कधी संपणार असा प्रश्न 

आता वैतागून ही मंडळी विचारत असून या पेक्षा न जगलेले बरे अशी त्यांच्या मनाची भावना तयार झाली तर नवल वाटणार नाही. 

रविवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी महागाव येथील ग्रामस्थांनी त्यांच्या भावना प्रसारमाध्यमांशी व्यक्त केल्या जाणून घेऊया.