गोदावरी अर्बनचे दैदिप्यमान यश सकारात्मक कार्यक्षमता, ग्राहकांची विश्वासहर्ता आणि दूरदृष्टीमुळे - माजी मंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर
--------
नांदेड : गोदावरी अर्बनच्या उत्तुंग दैदिप्यमान यशात नियोजनबद्ध व्यवस्थापन, कार्याप्रती असणारी सकारात्मकता आणि ग्राहक ठेवीदारांचा संपादित केलेला
प्रचंड विश्वास या त्रिसूत्रीचा मोलाचा वाटा असल्याचे प्रतिपादन माजी राज्यमंत्री डॉ.माधवराव पाटील किन्हाळकर
यांनी गोदावरी अर्बनच्या ८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये केले. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील,
अध्यक्ष राजश्री पाटील, उपाध्यक्ष हेमलता देसले, व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, सचिव ऍड.रविंद्र रगटे,
सर्वश्री संचालक प्रा.सुरेश कटकमवार, साहेबराव मामिलवाड, वर्षा देशमुख, प्रसाद महल्ले पाटील,
वैधानिक लेखापरिक्षक जीवन लाभशेटवार, मुख्य व्यस्थापक सुरेखा दवे यांची उपस्थिती होती.
उदघाटनप्रसंगी बोलताना डॉ.किन्हाळकर म्हणाले कि, मराठवाड्याची आर्थिक परिस्थिती अयोग्य असताना सुद्धा
आठ वर्षांपूर्वी गोदावरी अर्बनचा खडतर प्रवासाला सुरवात झाली आणि ते आज यशाची अनेक शिखरे सर करत आहेत.
दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार आपण सकारात्मकपणे केला तर त्यात आपलेही कल्याण होते.
तीच विचारसरणी खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांच्या मध्ये आहे.
याकरिता त्यांना साथ मिळाली आहे ती पुढे जाण्याचा दृढनिश्चय आणि व्यवस्थापनाची जोड यामुळे आगामी काळात गोदावरी अर्बन राज्याच्या लौकिकामध्ये दैदिप्यमान यश संपादन करून उत्तुंग झेप घेणार आहे यात दुमत नाही.
गोदावरी अर्बनला आजवर मिळालेले पुरस्कार हे त्यांच्या कार्यक्षमतेचे दूरदृष्टीचे आणि लोकांच्या आपुलकीचे आणि प्रत्येकाशी ठेवलेल्या सकारात्मक भावनेचे प्रतिक आहे.
संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील म्हणाले कि, अवघ्या आठ वर्षाच्या कालखंडात गोदावरीने प्रामाणिकपणे कार्य करून ग्राहक ठेवीदारांचा विश्वास संपादित केला आहे.
तसेच बदलत्या काळासोबत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून डिजिटल दुनियेमध्ये ग्राहकांना सुविधा दिल्या आहेत.
ज्या सर्वसामान्य माणसाची कोणतीही पत नाही त्यांना उद्योग व्यवसायासाठी हजारो कोटींचा कर्ज पुरवठा करून उभे केले आहे.
संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील म्हणाल्या कि, सभासदांना ७%टक्के लाभांश जाहीर करतांना मनस्वी आनंद होत आहे. सामान्य माणसाला आर्थिक दृष्टया सक्षम करून,
आज पाच राज्यामध्ये गोदावरीच्या कार्याचा विस्तार झाला आहे. आम्ही काळानुरूप बदलत जाणाऱ्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेतली आहे.
पुढेही दर्जेदार सेवा देण्यासाठी संस्था तत्पर आहे. कोरोनाच्या काळात केवळ व्यवसाय हा उद्देश डोळ्यासमोर न ठेवता सामाजिक भान जागृत ठेवून ग्राहकांना आधार दिला
आणि त्यांच्या आशिर्वादामुळेच आम्हाला प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊन गोदावरीच्या कार्याची गती वाढली आहे.
सभेचे प्रास्तविक आणि अहवाल वाचन करतांना व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर म्हणाले की,
नेट बँकिंग, एनइएफटी, आरटीजीएस, मोबाईल बँकिंग, एटीम सुविधा आणि आता नव्याने सुरू करण्यात आलेली
क्यूआर कोड प्रणाली व बीपीआर प्रोजेक्टच्या माध्यमातून पारदर्शक, गतिमान व्यवहार होणार आहेत
त्याचे पाचही राज्यातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. कॅश डिलिव्हरी व्हॅन या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहक,
ठेवीदार यांना उत्तमतोम दर्जेदार सुविधा देऊन कामकाजात सुसूत्रता आणणार आहोत असे सांगितले आहे.
कोरोना या पार्श्वभूमीवर Online वार्षिक सर्वसाधारण सभेला वरिष्ठ व्यवस्थापक रवी इंगळे,
व्यवस्थापक अधीक्षक विजय शिरमेवार, व्यवस्थापक भारत राठोड, पाच राज्यातील अधिकारी, कर्मचारी,