Ticker

6/recent/ticker-posts

शिवसैनिकांनी गाठल्यानंतर कोठारी ( चि ) पुल तात्काळ दुरुस्तीचे अधिक्षक अभियंत्यांनी दिले आदेश


शिवसैनिकांनी गाठल्यानंतर कोठारी ( चि ) पुल तात्काळ दुरुस्तीचे  अधिक्षक अभियंत्यांनी दिले आदेश


किनवट : येथून दक्षिणस ४ किमी अंतरावर असलेल्या कोठारी ( चि ) पुलावरील स्लॅब तुदून पडलेले भगदाड त्वरीत बुजवावे, 

ये जा करणाऱ्या प्रवाशांची जीवित हानी टाळावी, अन्यथा येथील सार्वजनिक बांधकाम 

विभागाच्या उपविभागीय अभियंता कार्यालयास टाळे ठोकुन शिवसेना स्टाईल अंदोलन छेडले जाईल. असा इशारा दिल्यानंतरही 

दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड युवासेना तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे यांनी गाठले नांदेडचे अधिक्षक अभियंत्यांचे कार्यालय. 

तेव्हा कोठारी ( चि ) पुल तात्काळ दुरुस्तीचे त्यांनी दिले आदेश .
         

 तालुक्यातील कोठारी (चि ) नाल्यावर बारमाही प्रवास करण्यासाठी कायम स्वरूपी उंच पुल व्हावा ही अनेक वर्षापासून मागणी आहे. 

परंतु सिमेंट पाईप अंथरून त्यावर स्लॅब टाकून कसाबसा पुल सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आहे. शनिवारपेठ, पार्डी, बोधडी (खु ), भूलजा, 

येंदा -पेंदा, कोपरा अशा अनेक गावांसाठी हाच मुख्य मार्ग आहे. थोडाजरी 

पाऊस झाला तरी या पुलावरून पाणी जातं, 

त्यामुळे अनेकांना ताटकळत थांबावं लागतं. मागच्या झडीत या पुलावरील स्लॅबला मोठे भगदाड पडले.

 वाहते पाणी असतांना पुलावरुन प्रवास करणाऱ्या दुचाकी,
चार चाकी वाहनचालकास तसेच पायी प्रवास 

करीत पुल पार करणाऱ्या प्रवाशास हे भगदाड सहजा सहजी दिसत नाही. 

मागील पावसात एका दुध विक्रेत्याचा 
येथे बळी गेलाच. 

त्यामुळे या भगदाडात वाहन आडकुन किंवा पडुन जिवीत हानी होऊ शकते . 

हा संभाव्य जिवघेणारा धोका टाळण्या करीता तुटलेले भगदाड तात्काळ दुरुस्त करून प्रवाशांची गैरसोय तात्काळ दुर करावी. 

अन्यथा आपल्या किनवट येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय 

अभियंता कार्यालयास टाळे ठोकुन शिवसेना स्टाईल अंदोलन छेडले जाईल . 

याची गांभीर्याने नोंद घ्यावी . 
असे निवेदन  नांदेड जिल्हा विकास समन्वयक सनियंत्रण ( दिशा ) समितीचे सदस्य तथा 

ज्येष्ठ शिवसैनिक मारोती कानबाराव सुंकलवाड, शिवसेना शहर प्रमुख संतोष येलचलवार,

 युवासेना तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेडचे अधिक्षक अभियंता यांना दिले होते.
     

  परंतु अद्यापही त्यांनी काहीच पुढाकार न घेतल्याने मगळवार (दि.14 ) रोजी दिशा 

समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ शिवसैनिक मारोती कानबाराव सुंकलवाड व युवासेना 

तालुका प्रमुख प्रमोद केंद्रे यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या मागदशनाखाली सार्वजनिक 

बांधकाम मंडळ नांदेडचे अधिक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांची प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थिती मांडली. 

नवीन पुलाची गरज आहेच परंतु सध्या भगदाड दुरुस्ती महत्वाची आहे.

 अधिक्षक अभियंत्यांनी किनवटचे अभियंता दिलीप बोबडे यांना भ्रमणध्वनी वरून तात्काळ पुलाचे काम सुरु करावे असे  आदेश दिले. त्यामुळे आता पुल होणार ! 

ह्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.