(किनवट) महाविद्यालयीन जीवनामध्ये विद्यार्थ्यांना एनसीसी च्या माध्यमातून सैनिकी पूर्व प्रशिक्षण दिल्या जाते आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम चारित्र्य धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन तसेच त्यांच्या मध्ये आत्मविश्वास जागृत करून राष्ट्र सेवा करण्याची
संधी उपलब्ध करून देण्याचे काम राष्ट्रीय छात्र सेनेच्या माध्यमातून केले जाते असे प्रतिपादन
किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड यांनी एनसीसी विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.
बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे आज 15 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात
राष्ट्रीय छात्र सेनेच्या सी सर्टिफिकेट प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव ,
सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आला होता गुणगौरव सोहळ्याचे
अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार, सचिव शंकररावजी चाडावार
कोषाध्यक्ष जसवंतसिंग सोखी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर प्रा. गुलाब राठोड प्रा. सूर्यकांत चाटे, प्रा. इंगोले आदी उपस्थित होते
पुढे बोलताना प्रफुल्ल राठोड म्हणाले की स्पर्धात्मक युगामध्ये जिद्द व मेहनत याची अत्यंत गरज असून जीवनामध्ये
आपापल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेहनत करावी
तसेच आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभाग नोंदविण्याचे आव्हान याप्रसंगी केले.
15 विधार्थ्यांनी C सर्टिफिकेट प्राप्त केले. यापैकी राठोड निलेश, देवकर अर्जुन,
जाधव प्रदिप या विद्यार्थ्यांनी A ग्रेट प्राप्त केले आहे. 11 विद्यार्थ्यांनी B ग्रेड प्राप्त केले
आणि एका विद्यार्थ्यांनी C ग्रेड प्राप्त केले
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ
सन्मानपत्र व पदक देऊन
सत्कार करण्यात आला.
निलेश राठोड या विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी मधून म्हणून आपले मनोगत व्यक्त केले
सत्कार कार्यक्रमाचे आयोजन एन. सी. सी. विभाग प्रमुख प्रा. काझी एस. एस.यांनी केले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
प्रा, राजकुमार नेमानीवार, प
र्यवेक्षक प्रा.अनिल पाटील मुक्त विद्यापीठाचे प्रा. शिवदास बोकडे
डॉ. आनंद भालेराव, प्रा. ममता जोनपल्लीवर ,प्रा. ज्ञानेश्वर चाटे,प्रा. जय चव्हाण
आदींनी प्रयत्न केला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.पुरुषोत्तम येरडलावार यांनी केले
आभार उपप्राचार्य प्रा. गजानन वानखेडे