गोदावरी अर्बनचे अध्यक्ष राजश्री पाटील मराठवाडारत्न पुरस्काराने सन्मानित
नांदेड: गोदावरी अर्बनने पाच राज्यासह मराठवड्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट व भरीव
कामगिरी केल्याबद्दल लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्या
वतीने संस्थेच्या अध्यक्ष राजश्री पाटील
यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार सोहळ्याचे वितरण हॉटेल रामा इंटरनॅशनल, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते.
यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते गोदावरी अर्बनच्या
अध्यक्ष राजश्री पाटील मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी राज्याचे आरोग्य मंत्री
अंकुशराव टोपे,
ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, माजी मंत्री बाबनराव लोणीकर,
लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू, अभिनेता मंगेश देसाई आदी मान्यवरांची उपस्थित होते.
गोदावरी अर्बनची स्थापना २०१३ साली झाली आहे.
एकीकडे राज्यातील सहकार क्षेत्राला मरगळ आली असतांना या क्षेत्राला अवघ्या ८ वर्षाच्या कालावधीत राज्यासह
इतर पाच राज्यात झळाळी देण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
हजारो महिला बचतगटांना अर्थसाक्षरता प्रशिक्षण, लघुउद्योजक नव तरुणांना आर्थिक मदत,
व्यवसायिक प्रशिक्षण, बाजारपेठेचे मार्गदर्शन देऊन स्वतःच्या पायांवर उभं करण्याच काम केलं आहे.
संस्था उभरणीच्या पहिल्या दिवसापासून संस्थापक अध्यक्ष खासदार हेमंत पाटील
यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा दंडक घातला होता. ग्राहकांना सेवा देण्यासाठी ज्या अत्याधुनिक सुविधा नव्याने आल्या आहेत
त्या सर्वप्रथम गोदावरी अर्बन त्याचा अवलंब करते व त्याचे प्रशिक्षण आपल्या सर्व
शाखेतील कर्मचाऱ्यांना दिले जाते. या सर्व कार्याची दखल घेत
लोकशाही वृत्तवाहीनेच्या वतीने गोदावरी अर्बनच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांना मराठवाडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कारा बद्दल राजश्री पाटील यांनी गोदावरी अर्बनचे संस्थापक अध्यक्ष खासदार
हेमंत लोकशाही वृत्तवाहिनेचे संचालक धृमित नायडू यांचे आभार मानले.
हा पुरस्कार मिळाल्याबदल गोदावरी अर्बनचे उपाध्यक्ष हेमलता देसले
व्यवस्थापकिय संचालक धनंजय तांबेकर व समूहातील समस्त संचालक पदाधिकारी,
कर्मचारी तसेच विविध सामाजिक व राजकीय मान्यवरांनी आनंद
व्यक्त करीत पुढील वाटचालीच्या