किनवट ता.प्र दि २३ किनवट नगर परिषदेमुळे शहरातील नागरीकांना भेडसावना-या समस्यां मुळे शहरातील लोकप्रतिनिधी देखिल त्रस्त झाले आहेत यामुळे वार्ड क्रमांक २ चे
भाजप नगरसेवक व शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार यांनी शहरातील नागरीकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने एक निवेदन नगर परिषद प्रशासनास दिले होते
त्यानुसार नगर परिषद प्रशासनात कोणताही बदल न झाल्याने काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी नगराध्यक्ष,
उपनगराध्यक्ष, नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी यांच्या बैठक संपन्न झाली असुन
यामध्ये नगरसेवक श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना त्यांनी सादर केलेल्या १७ मुद्द्यानुसार काय कारवाई केली अशी विचारणा केल्या नंतर त्यांच्या प्रश्नास नगरपरिषद कर्मचारी हे निरुत्तर होते
यामुळे प्रशासनावर प्रचंड रोष व्यक्त करत श्रीनिवास नेम्मानिवार यांनी कर्मचा-यांना येत्या सोमवार पर्यंतची मुदत दिली असुन त्यांनंतर सविस्तर अहवाल तयार करुन
नगर परिषद कर्मचारी व अधिका-यांवर कायदेशिर कारवाई करण्याच्या दृष्टीन मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या दालणात रितसर तक्रार दाखल करुन
या निष्क्रीय कर्मचा-यां विरुध्द कडक कारवाई करण्याकरिता वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे
यावेळी श्रीनिवास नेम्मानिवार यांनी बैठकीत उपस्थित कर्मचारी व अधिका-यांना चेतावले आहे.
तरी मागील निवेदनात श्रीनिवास नेम्मानिवार यांनी नगर परिषद अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत सतत गैरहजर राहतात,
लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या कार्यालयीन कामात होणारी दिरंगाई, शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न,
मोकात जनावरामुळे होणारे अपघात, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परीसरातील अतिक्रमण व त्यामुळे होणारी वाहतुक कोंडी,
भाजीपाला मार्केट व आठवडी बाजारातील अतिक्रमण व अस्वच्छता,
साई नगर गार्ड्न व इस्लामपुरा सभामंडप यांचे व्यवस्थापन करण्यात होत
असलेली दिरंगाई व त्यामुळे उत्पन्न होत असलेले वाद विवाद, एल.ई.डी व सौर पथदिवे लावुन सुध्दा विज बिलात कपात का झाली नाही ? हा ही प्रश्न उपस्थित होतो,
घनकचरा व्यवस्थापनाची निविदा रखडल्याने शहरात माजलेली अस्वच्छता, नगर परिषदेत कार्यालयात दिव्यांगांची होत असलेली हेळसांड,
नगर परिषदेच्या आरक्षित जमिनी भुसंपादन करुन व त्याचा मोबदला देऊन सुध्दा सातबारा च्या नोंदी नाहीत तर काहीचे दस्त नोंदनी देखिल केली नाही
व ते करण्यास प्रशासन उदासिन या व अशा विविध समस्यांना करिता श्रीनिवास नेम्मानिवार हे नगर परिषद प्रशासना विरुध्द आक्रमक भुमिका घेत आहेत.
त्यांनी अधिकारी व कर्मचा-यांना ३० सप्टेंबर पर्यंत चे अल्टीमेटम दिले आहे.
ज्यामध्ये कर्मचा-यांनी वरिल मुद्द्यांच्या अनुषंगाने कारवाई करावी अन्यथा
किनवट शहरातील नागरीकांचे असुविधेमुळे बेहाल करणे व नगर परिषदेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या दृषीने बेजबाबदार पणा दाखवणे
या साठी कठोर कारवाई करण्यासाठी कर्मचा-यां विरुद्द मा.जिल्हाधिकारी यांच्या दालणात तक्रार करणार असल्याचे नेम्मानिवार यांनी यावेळी सांगितले.
आता नगर परिषद प्रशासन याकडे कोणत्या दृष्टीने पाहते व यावर काय कारवाई करते याकडे शहरातील सर्व सुज्ञ नागरीकांचे लक्ष लागले आहे
कारण सन २०१७ निवडणुकीत मोठ्या आशेने या पदाधिका-यांना शहरातील नागरीकांनी निवडुन दिले आहे.
यात एक दोन वगळता कोणतेही पदाधिकारी काही ठोस भुमिका मांडु शकले नसल्याने शहरातील नागरीकांचा यामुळे यांच्याकडुन मोठा हिरमोड झाला आहे.