टिपू सुलतान ब्रिगेडची बैठक संपन्न
किनवट /सय्यद नदीम/
आज मा. शेख सुभान अली (राष्ट्रीय अध्यक्ष, टिपू सुलतान ब्रिगेड
व प्रदेश सचिव,
राष्ट्रवादी काँग्रेस)
सरांच्या अध्यक्षतेखाली
टिपू सुलतान ब्रिगेडची बैठक संपन्न झाली. बैठकीत सरांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
मा. शेख सुभान अली सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,
आज देश संकटातून जात आहे.
आज सामान्य माणूस गरीबी, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, भेदभाव, शोषण इ.
विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे,
महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत, शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे,
नोकरी अभावी आणि काम नसल्यामुळे युवा पिढीत नैराश्य येत आहे.
अशा संकट समयी टिपू सुलतान ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आपल्या
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून
काम केले पाहिजे.
टिपू सुलतान ब्रिगेडच्या कार्यक्त्यांनी
देश सेवेसाठी आणि मानव सेवेसाठी
स्वतःला झोकून दिले पाहिजे. जात,
धर्म आणि संप्रदाय इ. च्या पलीकडे
जाऊन विचार करावा.
सर्वांना न्याय आणि मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे.
बैठकीला टिपू सुलतान ब्रिगेडचे वरीष्ठ
मार्गदर्शक शेख उस्मान टेलर (हिंगोली), हिंगोली येथील प्रसिद्ध विधिज्ञ ॲड. जाकीर खान पठाण,
टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान,