लोकप्रतिनिधी, प्रशासन तुपाशी दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार उपाशी तिन पक्षाच्या मंञीमहोद्य लक्ष देतील काय? चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर
माहुर
दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली
नादेड जिल्हयातील सर्व तहसिलदार साहेब यांच्या मार्फत मा आयुक्त साहेब औरंगाबाद,
दिव्यांग आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी साहेब नांदेड, मुख्यकार्यकारी जि प नांदेड यांना
निवेदण देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न माहुर तहसिलदार साहेब ,
यांना नांदेड जी उपअध्यक्ष राजाभाऊ शेरकुरवार ता अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण यांच्याशिष्टमंडळ चर्चा करून निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला
महाराष्ट्र शासन प्रशासन जरी तुपाशी खात असतील पण जे दिनदुबळे दिव्यांग वृध्द निराधार यांना दर महा 1000 रू जगण्यासाठी दिले जाते
त्यात दोन वेळा चहा साठी दुधाचे पाकिट सुध्दा येत नाही ते कसे जगत असतील याचा विचार सतेत
बसलेल्या मंञ्यांना कळत नसेल काय? आमदार यांना दरमहा लाखो वेतन मिळते अनेक भत्ते मिळतात
प्रशासकीय कर्मचारी यांना लाखो रूपये पगार मिळताना ते पुरत नाही म्हणून ते संप करून पगार, महागाई भत्ता वाढ केली जाते.
पण ज्या गोरगरीब जनतेच्या मतावर सतेत जाताना दिनदुबळ्याचे मीच कैवारी म्हणून
मते मागतात त्या लोकप्रतिनिधी दिनदुबळ्याचा विचार का?
करीत नाहीत असे शासन प्रशासन यांना वेळेवर मानधन, पगार मिळते
तर दिनदुबळ्याना मिळणारे एक हजार रुपये तेहि पाच महिने मिळत नाही व अनेक सवलतीसाठी दिव्यांग वृध्द निराधार
यांना शासन प्रशासन जागे करण्यासाठी मोर्चा,धरने,आंदोलन करून न्याय मिळत नसल्याने
दिव्यांग वृध्द, निराधार रसत्यावर उतरतील यांची प्रशासनाने दखल घ्यावी या निवेदनात जि ऊप अध्यक्ष राजु शेरकुरवार ता अध्यक्ष प्रेयसिग चव्हाण ,