Ticker

6/recent/ticker-posts

भेटी देत तक्रारी व स्वागत स्विकारत प्रश्नावलीची उत्तरे घेत पंचायत राज समितीचा किनवट तालुका दौरा सुरळीतपणे पार

भेटी देत तक्रारी व स्वागत स्विकारत प्रश्नावलीची उत्तरे घेत पंचायत राज समितीचा किनवट तालुका दौरा सुरळीतपणे पार 

किनवट : सन 2017-18 च्या वार्षिक प्रशासन अववालाच्या प्रश्नावलीची उत्तरे, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळा भेट, 

अनेकांच्या तकारी व विविध ठिकाणचे स्वागत स्विकारत महाराष्ट्र राज्य विधान मंडळ, 

पंचायत राज समितीचा किनवट तालुका दौरा सुरळीतपणे पार पडला.
       

तालुका भेटीसाठीचे पंचायत राज समिती गट प्रमुख आमदार विक्रम काळे, आ. डॉ. देवराव होळी, 

आ. किशोर जोरगेवार, आ. रत्नाकर गुट्टे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, उपायुक्त गोडे, विधान मंडळ कर्मचारी केतन बागवे यांचे

 शुक्रवार (दि. 03 ) रोजी दुपारी 2.30 वाजता तालुक्याची सीमा बुरकुलवाडी येथे आगमन झाले. यावेळी गट विकास अधिकारी सुभाष धनवे, 

गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल बागल, 

पशुधन विकास अधिकारी डॉ.एस . एन. आडपोड आदिंनी पुष्पगुच्छ देऊन केलेल्या मान्यवरांच्या स्वागता सोबतच पावसानेही स्वागत केले.
          
 त्यानंतर समिती थेट प्राथमिक आरोग्य केंद्र ईस्लापूरात दाखल झाली. 

 वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड व स्टॉफनी स्वागत केले. 

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम बोनगीर समिती समोर म्हणाले, 
येथील वैद्यकीय सेवा अत्यंत चांगली आहे. 

असा ठराव ग्राम पंचायतीने सुद्धा घेतला आहे.  
काही कार्यकर्त्यांनी नुतन बांधकाम झालेल्या 

इमारतीच्या बांधकामाकडे समितीचे लक्ष वेधले. समितीने शवविच्छेदन गृहाची स्थिती पाहिली. 

ग्रामपंचायतीला भेट देऊन समिती सहस्त्रकुंड पर्यटन स्थळी रमली. येथे अनेकांनी त्यांचे सोबत फोटो घेतले.
        
 त्यानंतर समिती कोठारी (चि) येथे पोहचली असता मातोश्री कमलताई ठमके इंग्रजी शाळेत  

मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांनी स्वागत केले. 

दरम्यान समिती सदस्य आ. डॉ. देवराव होळी यांनी रूट गाईड गट 

शिक्षणाधिकारी किशन फोले यांचे समवेत जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा मांडवा येथे भेट दिली. 

विज्ञान प्रयोगशाळा पाहून कौतुक केले. तिथे अटल घनवन मियावाकी प्रकल्पात वृक्षारोपन केले. 

यावेळी शिक्षण विस्तार 

अधिकारी ना.ना. पांचाळ, केंद्रप्रमुख बी. व्ही. थगनारे, केद्रिय मुख्याध्यापक गोवर्धन मुंडे आदिंनी स्वागत केले. 
        

 समिती सदस्यांनी घरी भेट दिली म्हणून आ. भीमराव केराम यांनी सर्वांचा गौरव केला. 

त्यानंतर समितीचे पंचायत समिती
 प्रवेशद्वारावर आगमन झाले 

तेव्हा तालुक्याची लोकसस्कृती म्हणून ओळख असलेल्या आदिवासी ढेमसा,दंडार नृत्याने व औक्षणाने अनोखे स्वागत करण्यात आले. 

सभागृहात स्थानापन्न झाल्यानंतर सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, 

उप सभापती कपिल करेवाड व पंचायत समिती सदस्य निळकंठ कातले यांनी स्वागत केले. 

उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
         

  यावेळी झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या सन 2017-18 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या 

क्षेत्रातील पंचायत समितीच्या सखोल परिक्षणासाठी तयार करण्यात आलेल्या

 सुधारित प्रश्नावली क्रमांक 2 ची उत्तरे पंचायत राज समितीने घेतली. 

जनतेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानेही विचारणा केली. 

येथील कार्यवाही पूर्ण करून समिती रात्री नऊच्या सुमारास माहूरकडे रवाना झाली .