Ticker

6/recent/ticker-posts

किनवट (ता. प्र. मारोती देवकते) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन तालुक्यात व ग्रामिण भागात वितरित होणाऱ्या विजेचा लपंडाव सुरु आहे तर कमी वीज दाबामुळे किनवट तालुका अंधारमय झाला आहे. वीज पुरवठा वांरवार खंडीत होत


*तालुक्यासह संपूर्ण ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरुच.*

सिरमेटी,घोटी, कमठाला,गणेपुर, लोणी, राजगड अशा ग्रामीण गावांची दयणीय अवस्था.

किनवट (ता. प्र. मारोती देवकते) : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असुन तालुक्यात व ग्रामिण भागात वितरित होणाऱ्या विजेचा लपंडाव सुरु आहे

 तर कमी वीज दाबामुळे किनवट तालुका अंधारमय झाला आहे. 

वीज पुरवठा वांरवार खंडीत होत 

असल्याने पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण होत आहे 

तसेच विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक उपकरणे निकामी होण्याची भीती वाढली आहे.
        

  गर्मीमुळे लहान मुलासह अबालवृध्दानां याचा त्रास सहन करावा लागत आहे 

विजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन, कुलरचा वापरही निट करता येत नाही.

आज ची परिस्थिती पाहता कुलर व फॅन ची अत्यंत आवश्यकता आहे. 

कारण पावसाळ्याचे दिवस चालू असल्याने मच्छरांचा फार त्रास होतो आणि त्यात आरोग्याची समस्या, 

कारण या मच्छरांन पासुन तर डेंगो मलेरिया सारखे  जीवघेणे रोग निर्माण होत आहेत.
           

त्यामुळे परीसरातील जनता त्रस्त आहे दर पाच - पाच मिनीटात वीज खंडीत होत असल्याने नागरिक वीज महावितरण बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे. 

थोडाही वारा सुटला  कि लाईन गुल होते या बाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेल्याचे सांगितले जाते. 

विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, 

राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही ही एक शोकांतिका आहे. 

तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ लागेल याची काहीच शास्वती नाही.
         

   विजेच्या लपंडाव दरम्यान गुल झालेला वीज पुरवठा सुरू होण्यास कर्मचारी व अधिकाऱ्यांना संपर्क करण्याशिवाय पर्याय नाहीत 

मात्र संपर्क केल्यावरही वीज पुरवठा नियमित होण्यास मोठी दिरंगाई केली जात आहे. यामुळे सिरमेटी,घोटी, 

कमठाला,गणेपुर, लोणी, राजगड, तसेच प्रत्येक गावातील जनता त्रस्त झाली आहे. 

तरी तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी तालुक्यातून केली जात आहे.