Ticker

6/recent/ticker-posts

देगलूर बिलोली निवडणुकीत वादळ येणार - प्रा.उत्तमकुमार कांबळे


देगलूर बिलोली निवडणुकीत वादळ येणार - प्रा.उत्तमकुमार कांबळे


देगलूर -.जावेद अहेमद 


नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली या मतदारसंघाची पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली.

 या पोटनिवडणुकीसाठी अनेकांनी दंड थोपटले 

असेल तरी जनतेची भावना अशी आहे की,मतदारसंघाचा विकास हा उच्च शिक्षित व्यक्तीच करू शकतो.

कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाच्या मंत्रिमंडळात फेरबदल करत भारत देशाच्या 

सेवेतील अव्वल स्थानावर कार्यरत असलेल्या अनेकांना पंतप्रधान मोदींनी मंत्रिमंडळात 

संधी देत उच्च शिक्षित व अनुभवी व्यक्ती हा देशाचा/राज्याचा विकास करू शकतो. हे या मंत्रिमंडळ नियुक्तीतून दाखवून दिले.

तसेच या देगलूर-बिलोली मतदारसंघात गत २७ वर्षांपासून मी शैक्षणिक क्षेत्रात उत्तमरित्या 
असंख्य विद्यार्थी घडविण्याचे कार्य आजतागायत करत आलो आहे. परंतु विद्यार्थी घडविण्याबरोबरच 

या मतदारसंघात असलेल्या पायाभूत,मूलभूत सुविधा सर्व सामान्य जनतेला लाभ मिळावा यासाठी प्रयत्नशील असेल. 

गत १ महिन्यांपूर्वी देशाचे रोडकरी आपले गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील विविध

 पुलांचे मजबूतीकरण राष्ट्रीय महामार्गावर वळण रस्ते या सारख्या अनेक सुविधांबाबत मागणी केली

त्यांनी या सर्व विषयी सकारात्मक प्रतिसाद दिला,लवकरच सुविधा उपलब्ध होतील असे आश्वासनही दिले.


आपल्या या मतदारसंघाला पीकविमा मंजूर झाला परंतु अद्याप एक रुपया सुद्धा मिळाला नाही,

असेच जर जिल्ह्यातील मंत्री पदावर असणारे लोकप्रतिनिधी करणार 

असतील तर मतदारसंघात विकासाची गंगा कशी वाहील. 

जनतेने उच्च शिक्षित चेहरा स्वीकारण्याचे ठरविले आहे,

त्यामुळे आपल्या राज्याचे भाग्यविधाते विपक्ष नेते देवेंद्र जी फडणवीस,जिल्ह्याचे नेते 

प्रतापराव पा.चिखलीकर, मा. भास्करराव पाटील खतगावकर, व जिल्हाध्यक्ष 
व्यंकटराव पा.

गोजेगावकर यांच्या सहकार्याने या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी मैदानात दंड थोपटून उतरलेलो आहे,

या मतदारसंघात सध्या वरुण राजाचे चक्रीवादळ आहे,पण भाजपचे चक्रीवादळ येणार हे निश्चित झाले आहे