Ticker

6/recent/ticker-posts

तलाठी विश्वास नामदेव धुप्पे यांना महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवारत्न पुरस्कार प्रदान


तलाठी विश्वास नामदेव धुप्पे यांना महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवारत्न पुरस्कार प्रदान


किनवट : तालुक्यातील माळबोरगाव येथील रहिवाशी  तथा पाटोदा (बु )चे तलाठी विश्वास 

नामदेव धुप्पे यांना महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
     
   विश्वास धुप्पे यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत शिकवणी वर्ग घेऊन पदवीचे शिक्षण घेतले.

 त्यानंतर लातूर जिल्हा निवड समितीची स्पर्धा परीक्षा देऊन ते लातूर 

जिल्ह्यात असलेल्या जळकोट तालुक्यातील पाटोदा (बु) सज्जाचे तलाठीपदी रुजू झाले. 

तिथे विश्वास नामदेव धुप्पे यांनी कोविडच्या काळात जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी महसूल विभागात उत्कृष्ट कार्य केले आहे. 

या त्यांच्या दैदिप्यमान कार्याबद्दल त्यांना महात्मा जोतिराव फुले शिक्षक परिषद, नांदेडच्या वतीने कुसूम सभागृहात 

माजी उच्च तंत्रशिक्षण मंत्री डी.पी.सावंत यांचे हस्ते ब्रिगेडीअर सुधीर सावंत, आ. बालाजी कल्याणकर,

आ. मोहन हंबर्डे यांचे उपस्थितीत राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
        

याप्रसंगी त्यांच्या आजीबाई
 लक्ष्मीबाई खंडूजी कानिंदे, 

मामा तथा बानाईचे कार्यकर्ते अभियंता भरतकुमार कानिंदे, 

गौतम कानिंदे, बहिण संगीता 
मनोहर पाटील व पत्नी कविता 
विश्वास धुप्पे  त्यांचे समवेत होते. 

त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंजुश्री पाटील, अभियंता अशोक येरेकार, सुनिता भरतकुमार कानिंदे, उत्तम कानिंदे, 

अर्चना भालचंद्र पाटील, अभियंता दीर्घायू गोविंद कानिंदे, जयश्री प्रदीप भगत, 

अभियंता आशुतोष पाटील, ज्योती
 आशुतोष शिरोळे,

 पुनम निखिल कानिंदे, दीपाली पोपुलवाड आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.