Ticker

6/recent/ticker-posts

किनवट तालुक्यातील ग्रामसेवक अतुल लक्सरे यांची गळफास घेऊन आत्महत्या


किनवट तालुक्यातील ग्रामसेवक अतुल लक्सरे यांची गळफास घेऊन आत्महत्या



किनवट शहर प्रतिनिधी(राज माहुरकर)


 पंचायत समिती किनवट अंतर्गत येणाऱ्या मौजे माळबोरगाव, कनकवाडी चे ग्रामसेवक 

अतुल लक्ष्मणराव लक्षरे यांनी दिनांक 29-9 च्या सकाळी साडे चार वाजेच्या सुमारास 

गोकुंदा येथील दत्तनगर मधील किरायाच्या रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांचा पोलीस पंचनामा करण्यात आला मात्र आत्महत्येचे कारण आणखी कळू शकले नाही. ते मूळ मुखेड (पाळा)

  येथील रहिवासीअसून ते 38 वर्षाचे होते. गेल्या सहा वर्षापासून  

पंचायत समिती किनवट अंतर्गत ग्रामसेवकाचे कर्तव्य बजावत होते.

त्यांना एक मुलगा एक मुलगी पत्नी आई वडील भाऊ असा परिवार आहे.

 याबाबतचा पुढील तपास पोलीस स्टेशन किनवटचे पोलीस उपनिरीक्षक

 पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार चौधरी हे करीत आहेत.