Ticker

6/recent/ticker-posts

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे नुकसान भरपाई द्या - खासदार हेमंत पाटील


अतिवृष्टीने  नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे नुकसान भरपाई द्या -  खासदार हेमंत पाटील
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिंगोली, नांदेड आणि

 यवतमाळ जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात 
मागील चार दिवसापासून होत 
असलेल्या संततधार पावसामुळे  

अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने 
 नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे . 
             

     परतीच्या मान्सूनने   मागील चार दिवसापासून हिंगोली लोकसभा मतदार संघात  मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन

 खरिपाच्या कापूस,सोयाबीन, ज्वारी, मूग उडीद , सह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या पार्श्वभूमीवर
 खासदार हेमंत पाटील यांनी  मतदार संघातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतीचे 

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने 

आर्थिक  मदत मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत . 

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हिंगोली, कळमनुरी ,वसमत , सेनगाव , औंढा नागनाथ तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव, 

हिमायतनगर आणि किनवट, माहूर या व यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड , महागाव तालुक्यातअतिवृष्टी झाल्यामुळे  

मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे . तसेच काही ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी रस्त्यावरून 

वाहत असल्याने अनेक ठिकाणी  महामार्गवरील वाहतूक सुद्धा ठप्प झाली तर 

अनेक गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणी विदुत पुरवठा खंडित झाला आहे 

एकंदरीत परतीच्या मान्सूनने हाहाकार उडवला असल्याचे चित्र लोकसभा क्षेत्रात पाहावयास मिळत आहे    

निसर्गाच्या लहरीपणामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यावर दरवर्षी अनेक संकटे ओढवत 

आहेत.शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी खासदार हेमंत पाटील सातत्याने कार्य  करत 

असून हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले 
मागील चार- पाच दिवसापासून होत असलेल्या पावसाने थैमान घातले असून यामुळे हजारो 

हेक्टर वरील खरीप पिकाचे नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी नदीनाल्यांचे पाणी शेतात 

घुसून जमिनीचे सुद्धा नुकसान झाले  असून नेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. याबाबत 

खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली , नांदेड आणि यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांना , जिल्हा 

कृषी अधिकारी तसेच संबंधित तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना  तात्काळ अतिवृष्टीग्रस्त 

भागाचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी निर्देशित केले आहे .