Ticker

6/recent/ticker-posts

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मयताच्या वारसांना खासदार हेमंत पाटील व आमदार भीमराव केराम यांचे हस्ते धनादेशाचे वाटप


किनवट/प्रतिनिधी : तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पुरात वाहून गेल्याच्या तीन घटना घडल्या मयताच्या वारसांना खासदार हेमंत पाटील व आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते 

तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या उपस्थितीत सानुगृह अनुदानाचे वाटप दि 1 सप्टेंबर रोजी दुपारी तहसील कार्यालयाच्या सभागृहात 
प्रति वारसास चार लाख स्र्पयाचा धनादेश वाटप करण्यात आले.


ऑगस्ट महिन्यात तालुक्यातील मांडवी व शिवणी मंडळात पाऊस होऊन 

नाल्याला आलेल्या पुरात कोठारी (सि.) येथील अक्षय किशन प्रधान (18) हा दि. 18 ऑगस्ट रोजी वाहून गेला होता 
तर 24 ऑगस्ट रोजी शिवणी येथील प्रमिलाबाई लच्छना तमलवाड (67) व महबी रजाक आगुवाड (62) 

या दोन महिला पुरात वाहुन गेल्या होत्या महसूल विभागाने वेळीच पंचनामा केला 

तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर ही बाब टाकली मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन मधून तात्काळ निधी मंजूर केला 

असे धनादेश वाटप प्रसंगी खा. हेमंत पाटील यांनी सांगितले त्यामुळे राज्य शासन किती जनतेच्या काळजीचं आहे 
असे खा.पाटील यांनी स्पष्ट केले. 
यावेळी उपजिल्हाप्रमुख जोतिबा खराटे,

 माजी जि.प.अध्यक्षा जनाबाई डूडूळे, शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, 

शहरप्रमुख सूरज सातुरवार, भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, 

भाजपा नेते अनिल तिरमनवार, अविनाश चव्हाण, माजी नगराध्यक्ष सुनिल पाटील, 
दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, गजानन बच्चेवार, बालाजी आलेवार, भाऊराव राठोड, मारोती दिवसे पाटील, 

खा.हेमंत पाटील यांचे स्वीय सहायक सुनील गरड, निळकंठ कातले यांचेसह भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
खा. हेमंत पाटील यांनी मयताच्या कुटूंबातील वारसांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली 

आपण तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्याने बाधित क्षेत पहानी करण्यासाठी 

राष्ट्रीय महामार्गाच्या वाढत्या तक्रारी पाहता संबंधित गुत्तेदार व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका­यांशी चर्चा करण्यासाठी

 तसेच नारायण कटकमवार यांचे अपघाती निधन झाल्याने प्रा.किशनराव किनवटकर यांचे निधन झाल्याने, 
प्रा.इंद्रसिंग राठोड यांचे व हनमनलु दडगीलवार यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट घेण्यासाठी हा किनवट दौरा केल्याचे खा. हेमंत पाटील यांनी स्पष्ट केले