Ticker

6/recent/ticker-posts

*साकीनाका मुंबई व हैद्राबाद येथिल घटनेच्या निषेधात गोर सेने चा कँडल मार्च.* किनवट ( तालुका प्रतिनिधी) समाजामध्ये घडत असलेल्या समाजविरोधी घटनेचा विरोध हा मानवी समूह करत असतो परंतु त्यामध्ये किनवट येथील गोर सेना शाखा किनवट च्या वतीने अमानवी घटनेचा निषेध यामध्ये कॅण्डल मार्च काढला होता


साकीनाका मुंबई व हैद्राबाद येथिल घटनेच्या निषेधात गोर सेने चा कँडल मार्च.


किनवट ( तालुका प्रतिनिधी) समाजामध्ये घडत असलेल्या समाजविरोधी घटनेचा विरोध हा मानवी समूह करत असतो 

परंतु त्यामध्ये किनवट येथील गोर सेना शाखा किनवट च्या वतीने अमानवी घटनेचा निषेध यामध्ये कॅण्डल मार्च काढला होता

 त्यात कॅन्डल मार्च ची सूचना माननीय पोलीस निरीक्षक यांना दिलेली होती सदर कॅण्डल मार्च हा शांततेत पार पडला 

तसेच पोलीस स्टेशन किनवट ला दिलेल्या निवेदनामध्ये अगोदर गोर सेना 

किनवट च्या वतीने सूचनावजा नियमाचे अनुपालन या अनुषंगाने खालीलप्रमाणे निवेदन देण्यात आले होते
मा. पोलीस निरिक्षक साहेब, 

पोलीस स्टेशन किनवट ता. किनवट जि. नांदेड विषयः दि. 17.09. 2021 रोजी जीजामाता चौक किनवट या ठिकाणी सायं. 7 वाजता, साकीनाका मुंबई व हैद्राबाद 

येथिल घटनेच्या निषेधत कँडल मार्च च्या माध्यमाने covid-19 च्या महामारी मुळे सामाजिक अंतर पाडून शांततेत श्रद्धाजंली देत असल्या बाबत

महोदय, बाबत वरील विषयी आपल्या सेवेत गोरसेना किनवटच्या वतीने विनंती करण्यात येत आहे की, 

साकीनाका मुंबई व हैद्राबाद येथिल घटनेच्या निषेधत कँडल मार्चचे आयोजन 

आज दि. 17.09.2021 रोजी सायंकाळी 7 वाजता जिजामाता चौक किनवट येथे करण्यात येत असून 

दोन्ही कुटुंबाच्या परिवारास न्याय देण्यासाठी व आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी गोरसेना किनवट च्या माध्यमातून कँडल मार्च चे आयोजन करण्यात येत आहे.
 तरी मेहेरबान साहेब सदरिल घटनेचा निषेध शासना पर्यंत पोहचवून पिडितांना न्याय दयावा हि नम्र विनंती. सदर निवेदनावर @ अतूल राठोड

 (गोरसेना ताः अध्यक्ष  तथा प्रदिप राठोड (गोरसेना शहर अध्यक्ष  ) वॲड. टेकसिंग चव्हाण (गोरसेना ता. उपाध्यक्ष किनवट) इतर सर्व पदाधिकारी ,आदीच्या सह्या आहेत. 

निवेदनावर सह्या करणार कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त निवेदनाच्या अनुषंगाने 

आज सात वाजता कँडल मार्च काढण्यात आला सदर अमानवी घटना ह्या भविष्यात घडू नये यासाठी 
गोरसेना सतत प्रयत्न करत असते फार कमी दिवसांमध्येच मानवी समूहाच्या विकासात्मक दृष्टीने धडाडीचे निर्णय गोरसेना घेत आहे. 

अमानवी घटनेची निंदा गोरसेना नेहमीच करत असते, संपूर्ण मानवाचा विकास हा ध्यास धरून गोरसेना आपले काम करत आहे. 

त्यांच्या कामाला यश येवो व समाज विरोधी घटना घडूच नाही अशी परिस्थिती 

निर्माण करण्यासाठी खारीचा वाटा होईना किंबहुना त्याहूनही जास्त वाटा ते आज रोजी उचलत आहेत त्यांच्या कार्याला आज शोषित वर्ग हे शतशः नमन करत आहे.