Ticker

6/recent/ticker-posts

किनवट/प्रतिनिधी- नुकतेच दहावी व बारावी वर्गाचे कोचिंग क्लासेस सुरू झाले असताना चिडीमार युवकांनी गोकुंदा ठाकरे चौकासह परिसरात मुलींची छेडछाड करत त्रास देणे सुरू केले आहे


किनवट/प्रतिनिधी- नुकतेच दहावी व बारावी वर्गाचे कोचिंग क्लासेस सुरू झाले असताना चिडीमार युवकांनी 

गोकुंदा ठाकरे चौकासह परिसरात मुलींची छेडछाड करत त्रास देणे सुरू केले आहे. 

मोटर सायकल वरून मुलींना त्रास देणाऱ्या चिडीमारांचा बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ 

किनवट पोलीस स्टेशनने चिडीमार पथक नेमावे अशी मागणी 

पालक व विद्यार्थिनी वर्गाकडून
 केली जात आहे.
             

 जवळपास दोन वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा-महाविद्यालयासह खाजगी कोचिंग क्लासेस बंद होते 

आजच्या परिस्थितीत कोरोना जवळपास मोठ्या प्रमाणात आटोक्यात

 आल्यामुळे राज्य शासनाने शाळा महाविद्यालयासह 

खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली असल्याने

 किनवट शहरासह तालुक्यातील 

सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी गोकुंदा शहरातील ठाकरे चौक 

येथे खाजगी शिकवणी वर्गासाठी मोठ्या प्रमाणात येत असतात.
            
   या क्लासेसला येणाऱ्या मुलींना चिडीमार युवकांनी दररोज त्रास देणे सुरू केले आहे. 

विद्यार्थिनींना घरापासून ते क्लासेस 
पर्यंत पाठलाग करून 

अश्लील भाषा व गाणे म्हणत
 चिडीमार त्रास देत आहेत. 

मोटार सायकलवर तीन-तीन चिडीमार बसून वेगाने गाडी चालवत मुलींना घाबरवत आहेत. 

ही बाब अनेक मुलींनी आपल्या 
पालकांना सांगितले आहे. 

पालकांनी चिडीमार करणाऱ्या युवकांना बोलण्याचा व समजावून 

सांगण्याचा प्रयत्न केल्यास 
ते अरेरावीची भाषा करीत आहेत.
           

वेळीच किनवट पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन

 गोकुंदा येथील बंद असलेली तात्पुरती पोलीस मदत केंद्र पुन्हा सुरू करून 

चिडीमार पथक नेमून अशा चिडीमारांचा बंदोबस्त करावा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून 

विद्यार्थीनींना संरक्षण द्यावे अशी मागणी पालक व विद्यार्थिनी किनवट पोलिसांकडून करीत आहेत.