सबिया सैफीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी - टिपू सुलतान ब्रिगेड किनवटची मागणी
किनवट / सय्यद नदीम/
देशात आज महिला सुरक्षित नाहीत. बेटी बचाओ, बेटी पढाओ हे घोषवाक्य फक्त कागदावरच आहे.
प्रत्यक्षात देशात दररोज कुठे न कुठे स्त्रीवर अत्याचार होत आहे.
देशाच्या राजधानीत देखील महिला सुरक्षित नाहीत, ही आमची शोकांतिकाच आहे.
सबिया सैफी ही दिल्ली पोलीस दलात
डिफेन्सची नोकरी करीत होती.
27 ऑगस्ट रोजी ती अचानक बेपत्ता झाली. त्याच्या घरच्यांनी जागोजागी
त्याचा शोध घेतला पण ती सापडली नाही.
पोलीसांना व कलेक्टर साहेबांना मदत मागितली पण मदत मिळाली नाही.
नंतर तिचा मृतदेहच मिळाला.
त्याच्यासोबत चार जणांनी दुष्कर्म केले व चाकूने शरीरावर 50 ठिकाणी
जख्मी करून अत्यंत निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली.
एवढं होऊन देखील देशाच्या मुख्य मीडियाने त्याची साधी दखलसुद्धा घेतली नाही.
टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या आदेशानुसार आणि
मराठवाडा उपाध्यक्ष फयाज पठाण यांच्या मार्गदर्शनानुसार
आज टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम भाई यांच्या
नेतृत्वात आणि किनवट तालुका अध्यक्ष शेख शाकीर यांच्या नेतृत्वात
मा. उपविभागीय अधिकारी,
किनवट यांना एक निवेदन देण्यात आले
आणि सबिया सैफीच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी
व त्याच्या घरच्यांना न्याय देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
न्याय न मिळाल्यास टिपू सुलतान ब्रिगेडच्या वतीने सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला.
यावेळी किनवट शहर अध्यक्ष हाफिज तौसिफ खान, शब्बीर भाई, अब्दुल्ला चाऊस
, आमीर खान, ज़मीर शेख,