नांदेड चौफेर चे संपादक अरेफ खान समाजच्या भावना दुखावल्या प्रकाणी वर गुन्हा दाखल
प्रतिनिधी/
धान्याच्या व्यापारामध्ये विशिष्ट समाजाची लॉबी असून गोरखधंदा सुरु केल्याचे सांगत समाजाची बदनामी करणारे वृत्त प्रकाशित केल्याप्रकरणी
येथील एका संपादकावर वजिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते तथा संपादक असलेल्या मो. आरेफखान दुल्हेखान
यांनी त्यांच्या वृत्तपत्रात दि. ८ सप्टेंबर रोजी एक वृत्त प्रकाशित करुन धान्य घोटाळ्याच्या
गोरखधंद्यात ९१ पैकी दोन मुस्लिम तर बाकीचे ८९ जैन, मारवाडी, कोमटी समाज असून यात
या समाजाची लॉबी असल्याचे दाखवून दिले होते. या प्रकारामुळे जातीय तेढ निर्माण
होण्याची शक्यता असल्याने समाजाच्या भावना दुखावल्या असल्याची तक्रार माहिती अधिकारी संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष पवन शर्मा
यांनी केल्यानंतर या प्रकरणी पवन शर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद स्थानकात आरेफ खान
यांच्या विरोधात कलम २९५ अ व कलम ५०५ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला