हनेगाव येथील स्वर्गवासी पत्रकार प्रशांत माळगे व सगरोळी येथील पत्रकार बस्वराज वाघमारे यांच्या कुटुंबियांना मंगेश कदमने आर्थिक मदत करून दिला धीर
देगलूर
हल्ली कांही प्रमाणात दुरावत चालेली नाती ओशाळणारा मायेचा झरा अशा भयानक परिस्थितीत आजही समाजात कांही चांगली माणसे तग धरून आहेत
म्हणूनच सर्व कांही व्यवस्थित चालु आहे असे ढोबळ मानाने बोलले जाते.याचाच प्रत्येय माळगे कुटुंबीयांना आला.
हनेगाव येथील दै. आनंदनगरीचे पत्रकार प्रशांत माळगे यांचे 14 जून रोजी अपघाती निधन झाले होते,
नेहमीच एकमेकांच्या सुख-दुःखात सामील होऊन धीर देणारे मंगेश कदम यांना देगलूर तालुक्यातील कांही पत्रकार बांधवांनी माळगे
कुटुंबीयांची हलाखीची परिस्तिथी पाहता त्यांना मदत करण्याची विनंती केली होती.
सर्व पत्रकारांच्या विनंतीला मान देऊन मंगेश कदम यांनी स्वर्गवासी प्रशांत माळगे यांच्या पत्नीला रोख रक्कम दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली.
व माळगे कुटुंबियांना भविष्यात देखील मदत करण्याचे आश्वासन मंगेश कदम यांनी दिले.
मंगेश कदम यांनी ग्रामीणभागातील पत्रकाराच सुख दुःख ओळखून प्रशांत माळगे यांच्या कुटुंबियांची दि.११ सप्टेबंर रोजी हनेगाव येथे भेट घेतली
या भेटी दरम्यान कुटुंबियांना धीर देऊन आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे.
यावेळी भारावलेल्या कै.प्रशांत माळगे कुटुंबियाचे डोळे पानावले होते.
या प्रसंगी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड,मराठी पत्रकारसघांचे देगलुर तालुका अध्यक्ष श्याम वद्देवार ,
देगलूरचे माजी नगरसेवक शत्रुघ्न वाघमारे,पत्रकार मोहसीन मुजावर,अजहर आतार,
पत्रकार सदाम दावणगिरकर, किशोर आडेकर, उमाकांत पचंकले,सामीजीक कार्यकर्त तहेसीन अत्तार मरखेलकर, यांच्यासह