Ticker

6/recent/ticker-posts

शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना नवीन शिधापत्रिका द्या ; किनवट तालुका ग्राहक पंचायती ची मागणी*किनवट*, दि. : शहरातील अनेक गोरगरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत,अशा कुटुंबाची तपासणी करून त्यांना त्वरीत शिधापत्रिका देण्यात याव्यात,


शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबाना नवीन शिधापत्रिका द्या ; किनवट तालुका ग्राहक पंचायती ची मागणी

*किनवट*, दि. : शहरातील अनेक गोरगरीब कुटुंबाकडे शिधापत्रिका नाहीत,अशा कुटुंबाची तपासणी करून त्यांना त्वरीत शिधापत्रिका देण्यात याव्यात,

 अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत या नोंदणीकृत स्वंयसेवी ग्राहक संघटनेचे अध्यक्ष एड.एम.यु.सर्पे यांनी केली आहे. 
   

 शहरात मागील अनेक वर्षांपूर्वी शिधापत्रिका देण्यात आल्या होत्या.त्या कुटुंबापैकी अनेक कुटुंबामध्ये विभाजन झालेले आहे.

कुटुंबातील मुलांचे लग्न होऊन त्यांना मुले बाळे झाली आहेत.

त्यामुळे ते कुटुंबापासून विभक्त झालेले आहेत व त्यांना नविन शिधापत्रिका मिळणे गरजेचे झाले आहे.

त्यापैकी काही कुटुंबानी नविन शिधापत्रिका मिळविण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज देखील केले आहेत,
ते काही दिवसांपासून पेडींग आहेत.
 
  या संदर्भात ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष एड.सर्पे हे प्रभारी नायब तहसीलदार 
सर्व्हेश मेश्राम यांना भेटले असता त्यांनी सांगितले की,

सध्या आमच्या कडे नवीन शिधापत्रिका उपलब्ध नाहीत,

त्यामुळे आमचा नाईलाज आहे.आम्ही नविन शिधापत्रिका देऊ शकत नाही.
 

  जिल्हाधिकारी कार्यालयातून नवीन शिधापत्रिका मागुन घ्या व त्या गोरगरीब जनतेला त्वरित वितरीत करा ,

अशी विनंती सर्पे यांनी नायब तहसीलदार मेश्राम यांच्याकडे केल्यावर 

त्यांनी शिधापत्रिकांंची जिल्हा पुरवठा कार्यालयाकडे आपण मागणी करु ,असे आश्वासन दिले.
   

 दरम्यान,शासनाच्या पुरवठा विभागाचे कर्मचारी पुरवठा विभागात कार्यरत नाहीत,

महसुल विभागाचे कर्मचारी हे प्रभारी म्हणून पुरवठा विभागात पाठवण्यात येतात.

या कर्मचाऱ्यांना पुरवठा विभागाची
 माहीती नसते.
त्यामुळे पुरवठा विभागातील अनेक कामे रेंगाळतात व नागरिकांंना याचा नाहक त्रास  होतो. 

हा त्रास टाळण्यासाठी पुरवठा विभागाचेच कर्मचारी पुरवठा विभागात देण्यात यावेत,अशी विनंती एड.सर्पे यांनी तहसील प्रशासनाकडे केलेली आहे.