Ticker

6/recent/ticker-posts

UPSC Result : नांदेडमधील पत्रकाराचा मुलगा झाला IAS, 26 व्या वर्षीच सुमित धोत्रेचं पहिल्याच प्रयत्नात UPSCत यश


नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा अर्थात UPSC परीक्षेचा अंतिम निकाल लागला असून

 नांदेड येथील सामान्य परिवारातील व एका वृत्तपत्राचे पत्रकार
 असणाऱ्या पत्रकाराच्या मुलाने 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 660 रॅंकिंग घेत घेऊन यशाला गवसणी घातलीय.

 नांदेड शहरातील विजय नगर परिसरातील सुमित दत्ताहरी धोत्रे 

या युवकाने पहिल्याच 
प्रयत्नात IAS होण्याचे

 स्वप्न साकार करून यश खेचून आणलंय. विशेष बाब म्हणजे म्हणजे सुमितने वयाच्या 26 वर्षी हे 

यश संपादन केलेय. सुमित धोत्रे याचे 
वडील दत्ताहरी धोत्रे हे
 एका वृत्तपत्राचे पत्रकार असून 

दिव्यांग असणारी त्याची आई
 एका खाजगी शाळेवर मुख्याध्यापिका आहे.