Ticker

6/recent/ticker-posts

मौजे भीसी येथे शेत सर्वे नंबर 140 व 142 साठी गेल्या अनेक दिवसापासून रस्ता नाही.(मंडळाधिकारी ईस्लापुर यांनी कार्यतत्पर तहसीलदार साहेब यांच्या आदेशाला दीली केराची टोपली.


मौजे भीसी येथे शेत सर्वे नंबर 140 व 142 साठी गेल्या अनेक दिवसापासून रस्ता नाही.
(मंडळाधिकारी ईस्लापुर यांनी कार्यतत्पर तहसीलदार साहेब  
यांच्या आदेशाला दीली केराची टोपली.)

किनवट (तालुका प्रतिनिधी) मौजे भिसि तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील शेत सर्वे नंबर 140, 142 साठी वयोवर्ध 

छायाबाई गणपतराव कदम राहणार भिशी ता. किनवट जिल्हा नांदेड या शासन दरबारी गेल्या अनेक दिवसापासून आपली तक्रार करून शेवटी 20/01/2017 रोजी  

उपविभागीय अधिकारी साहेबांचे आदेश प्राप्त झालेत परंतु सदर आदेशाच्या अनुषंगाने कार्यतत्पर तहसीलदार साहेब यांनी मंडळ अधिकारी इस्लापुर 

यांना दिनांक 23/ 2/ 2021 तसेच 7/6/2021 रोजी आणि 2/9/2021 रोजी आपल्या पत्राद्वारे मुद्दे वांईज माहिती मागितली होती परंतु

 गेल्या अनेक महिन्यापासून मंडळाधिकारी इस्लापूर यांनी सदर पत्राचे कोणताही आहवाल आज पर्यंत माननीय तहसीलदार साहेब

 यांना दिलेला नाही म्हणून ज्येष्ठ नागरिक छायाबाई गणपतराव कदम यांना ये जा करण्यासाठी रस्ता नाही पर्यायाने 

अनेक शेतकऱ्याला रस्ता नाही केवळ आणि केवळ मंडळाधिकारी साहेब इस्लापुर यांच्या नाकर्तेपणामुळे 

आज रोजी ज्येष्ठ नागरिक छायाबाई हिच्यावर स्वतःच्या शेतात जाणे येणे करण्यासाठी रस्ता नाही त्याला केवळ आणि 
केवळ मंडळ अधिकारी जबाबदार आहे असे आपल्याला म्हणावे लागेल मंडळाधिकारी यांनी पत्राचे अनुपालन न केल्यामुळे 

कार्यतत्पर दंडाधिकारी तहसीलदार साहेब यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे  आश्वासन दिले आहे. 

ज्येष्ठ नागरिक छायाबाई गणपतराव कदम यांना त्यांच्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून शासन दरबारी नियमानुसार अर्ज करून किंबहुना तसे 

आदेश होऊन सुद्धा आज पर्यंत रस्ता न दिल्याने ज्येष्ठ नागरिक छायाबाई गणपतराव कदम यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या अन्याय होत आहे 

सदर अन्यायाचे निवारण शासन कशा प्रकारे करेल याची कुतुहलाने वाट मौजे भिशी व परिसरातील नागरिक वाट पाहत आहेत. 

प्रशासकीय यंत्रणा जर कार्यतत्परता नाही दाखवली तर अन्याय हा होतच असतो अशी परिस्थिती भिशी व परिसरातील नागरिकाला येत आहे 
त्यामुळे प्रशासकीय सेवेतील सर्वच लोक सेवकांनी त्यांच्याकडून कधीही अशी अनावश्यक बाब घडू नये म्हणजे

 त्यांनी शिस्तीत राहावे कार्यतत्पर राहावे यासाठी प्रशासनाने तर लक्ष देणे गरजेचे आहे परंतु सर्वसामान्य नागरिक हा जागरूक असल्यामुळे 

आज रोजी सर्वसामान्याच्या मताच्या अनुषंगाने योग्य त्या कारवाईसाठी व छायाबाई गणपतराव कदम यांना न्याय मिळावा अशी सर्वसामान्यांची भावना आहे.