*सन 2005 च्या पूर्वी लागलेल्या शिक्षकांना बंद करण्यात आलेली पूर्ण पेन्शन योजना पुनश्च चालू करण्यात यावी -सतिष राऊत*
*किनवट ता. प्रतिनिधी (आनंद भालेराव)*
महाराष्ट्रामध्ये 2005 च्या नंतर लागलेल्या शिक्षकांना पूर्ण पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे. ते पुनश्च चालू करण्यात यावी
अशी मागणी महाराष्ट्रातील पूर्ण पेन्शन लागू न झालेल्या तमाम शिक्षकाकडून अनेक वर्षापासून करण्यात येत आहे.
यासाठी शिक्षकांनी मोर्चे काढून अनेक वेळेस आंदोलने ही केली आहेत.
परंतु पूर्ण पेन्शन योजना अद्याप लागू करण्यात आलेली नाही.
त्यामुळे शिक्षकांच्या मनात सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण होत आहे.
भाजप मित्रपक्ष सत्तेत असताना याच सरकारमधील उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी 2019 मधील पावसाळी
अधिवेशनातील प्रश्नोत्तर काळा दरम्यान तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे,
व राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारलेले प्रश्न होता की 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर अनुदानावर आलेले
किंवा असलेले शिक्षक पेन्शन योजना बंद करण्याच्या आधी लागलेल्या शिक्षकावर अन्याय होत आहे.
तसेच 2005च्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना सर्व डिपार्टमेंट मध्ये पूर्ण पेन्शन योजना लागू आहे परंतु शिक्षण विभागामध्ये ते लागू नाही.
ही बाब शिक्षकावर अन्याय कारक आहे.