Ticker

6/recent/ticker-posts

*टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न*. *किनवट */सय्यद* *नदीम * टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा काल दि. 24 ऑक्टोबर 2021 रोजी नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला


टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न                  
      
किनवट /सय्यद नदीम 
 टिपू सुलतान ब्रिगेड नांदेड जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा काल दि. 24 ऑक्टोबर 2021 रोजी 

नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 

या मेळाव्यात नांदेड जिल्ह्य़ातील (दक्षिण) नांदेड जिल्ह्यातील जिल्हा पदधिकारी, सदस्य, तालुकाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष, 

शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य
 उपस्थित होते.
या मेळाव्यात जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली, धर्माबाद, 

उमरी, बिलोली आणि कंधार तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष पदी हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सलाम खुरेशी, 

जिल्हा संघटक पदी उमरी येथील ब्रिगेडचे जुने व समर्पित कार्यकर्ते फयाज पठाण, जिल्हा मीडिया प्रमुख आणि 

उमरी तालुका अध्यक्ष पदी बळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दैनिक समीक्षाचे उमरी तालुका प्रतिनिधी फेरोज पटेल,

 उमरी तालुका विद्यार्थी ब्रिगेड अध्यक्ष पदी सय्यद सुलेमान तळेगावकर,

 बिलोली तालुका अध्यक्ष पदी युवा कार्यकर्ते शेख इरफान आणि बिलोली तालुका उपाध्यक्ष पदी अफरोजखान पठाण, 

धर्माबाद तालुका उपाध्यक्ष पदी मिर्झा इब्राहिम बेग, धर्माबाद तालुका सचिव पदी सय्यद शाहिद अली, 

कंधार तालुका विद्यार्थी ब्रिगेड अध्यक्ष पदी कुर्ला येथील जुनेद अत्तार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 

मेळाव्यात पुढच्याच महिन्यात येणार्‍या टिपू सुलतान जयंती आयोजना बाबत चर्चा करण्यात आली. 
 

डाॅ. ज़हीरूद्दिन पठान (प्रदेश अध्यक्ष), सय्यद नदीम (जिल्हाध्यक्ष, नांदेड उत्तर) ईनामदार जकरीया 

(जिल्हाध्यक्ष, नांदेड दक्षिण), शेख शाकीर (किनवट तालुका अध्यक्ष), मिर्झां खुर्रम बेग पटेल (धर्माबाद तालुका अध्यक्ष) 

यांनी सर्व नव नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि टिपू सुलतान ब्रिगेड संघटनेच्या ध्येय आणि धोरणा बाबत, कार्यपद्धती बाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले.


महाराष्ट्र दंगामुक्त करण्यासाठी, महापुरूषांना अपेक्षित समाज निर्माण करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही नैसर्गिक आणि मानवीय मूल्ये समाजात रुजविण्यासाठी, 

राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यासाठी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी संघटनेची विचारधारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहोचवावी, असे आवाहन प्रदेश अध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान यांनी केले.