Ticker

6/recent/ticker-posts

किनवट(ता प्र )किनवट शिक्षण संस्था किनवट बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे 27 ऑक्टोंबर रोजी किनवट शिक्षण संस्था संचालक मंडळाची बैठक संस्थेचे अध्यक्ष प्रफूल्ल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली


किनवट(ता प्र )
किनवट शिक्षण संस्था किनवट बळीराम पाटील महाविद्यालय किनवट येथे 27 ऑक्टोंबर रोजी किनवट शिक्षण संस्था संचालक मंडळाची बैठक संस्थेचे अध्यक्ष प्रफूल्ल  राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली 

या बैठकीत सर्वानुमते किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून नारायणराव सिडाम तर सहसचिव म्हणून दिनकर चाडावार व इतर पदाधिकार्यां ची निवड करण्यात आली. 

किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष यांचे निधन झाल्याने जागा रिक्त होती कोरोनामुळे या निवडी पुढे ढकलण्यात आले होते 
आज रोजी कार्यकारिणीच्या बैठकीत नारायण सिडाम यांची उपाध्यक्ष  म्हणून दिनकर चाडावार सहसचिव, 

कार्यकारिणी सदस्य म्हणून मकसूद आलम व नरसिंगराव पिसारीवार यांना कार्यकारिणीवर घेण्यात आले. तसेच शाळा समितीवर नरसिंगराव सातूर वार आणि 

संस्थेच्या सदस्यपदी मा. खासदार महसूल मंत्री उत्तमराव राठोड यांची सून सौ.संध्याताई राठोड यांची सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली 

या कार्यकारिणीच्या बैठकीत माजी मंत्री खा.डी. बी .पाटील, 
किनवट शिक्षण संस्थेचे सचिव शंकरराव चाडावार, उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार जसवंत सिंग सोखि, गगन्नाजी नेमानीवार, 

यादवराव नेम्मानीवार, जे.बी. नंदा ,रामराव जाधव आदि  संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते 

संचालक मंडळ बैठकीपूर्वी मा. महसूल मंत्री खासदार उत्तमराव राठोड यांच्या अर्धपुतळाला  व दिवंगत सदस्यांना 

अभिवादन करून संस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीला सुरुवात करण्यात आले
 

निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सर्वांना शिक्षण मिळावे 

या हेतूने मा.खा.उत्तमरावजी राठोड साहेबांनी थोर समाज सुधारक बळीराम पाटील 
यांच्या नावे महाविद्यालयाची स्थापना केली आज त्यांच्याच ध्येयानं प्रेरित होऊन संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, 

विद्यार्थी या सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालयाचा विकास करण्याची संधी मला उपलब्ध झाली असल्याचे  ते  म्हणाले . 

नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवराज बेबरेकर यांनी अभिनंदन केले

 या संचालक मंडळ बैठकीचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष गंगारेडडी बैनमवार यांनी मानले